Masala Chickpea Sandwich: नाश्त्यात बनवा 'मसाला चिकपी सँडविच' आहे आरोग्यदायी आणि टेस्टी नाश्ता!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Chickpea Sandwich: नाश्त्यात बनवा 'मसाला चिकपी सँडविच' आहे आरोग्यदायी आणि टेस्टी नाश्ता!

Masala Chickpea Sandwich: नाश्त्यात बनवा 'मसाला चिकपी सँडविच' आहे आरोग्यदायी आणि टेस्टी नाश्ता!

Jan 04, 2024 09:25 AM IST

Breakfast Recipe: तुम्हाला वजन कमी करण्याची प्रक्रिया सोपी करायची असेल तर प्रथिनेयुक्त पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवा.

Protein Rich Breakfast
Protein Rich Breakfast (Freepik)

Healthy Breakfast Recipe: वजन कमी करण्याच्या मागे सगळेच लागले आहेत. पण ही प्रोसेसे नक्कीच सोपी नसते. अनेकांना याचे परिणामही लवकर हवे असतात. यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रथिनेयुक्त पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवा. विशेषत: नाश्त्यात असे पदार्थ बनवा. यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चविष्ट रेसिपीबद्दल सांगणार आहोत जी हेल्दी आणि टेस्टी आहे. याशिवाय ती काही मिनिटांत बनवता येते. ही डिश प्रोटीनने समृद्ध अशी आहे. यामुळेच तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल तर ही डिश उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.

लागणारे साहित्य

२ वाट्या उकडलेले चणे, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, १ टीस्पून धनेपूड, १ टीस्पून चाट मसाला, १/२ टीस्पून काळे मीठ, चवीनुसार पांढरे मीठ, चवीनुसार चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, ब्रेड आवश्यकतेनुसार , हिरवी चटणी.

जाणून घ्या कृती

> एका भांड्यात उकडलेले चणे घालून चांगले मॅश करा.

> यानंतर त्यात चिरलेला कांदा, धनेपूड, मीठ, काळे मीठ, पांढरे मीठ, चाट मसाला, चिली फ्लेक्स, धनेपूड घालून चांगले मिक्स करा.

> आता ब्रेड घ्या आणि तुमची इच्छा असल्यास त्याच्या कडा कापून घ्या किंवा तुम्ही ते जसेच्या तसे वापरू शकता.

> प्रथम ब्रेडवर हिरवी चटणी लावा.

> त्यावर चण्यांचे मिश्रण टाका.

> तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चवीनुसार वर चीज स्लाइसही ठेवू शकता. चीज नसेल तरीही ते खूप चवदार दिसते.

> सँडविच मेकरमध्ये किंवा तव्यावर ठेऊन आवडीनुसार बनवा.

> प्रोटीन रिच ब्रेकफास्ट मसाला चीकपीस सँडविच तयार आहे.

Whats_app_banner