Maggi Masala: जेवण आणखी टेस्टी बनवते मॅगी मसाला, घरी बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Maggi Masala: जेवण आणखी टेस्टी बनवते मॅगी मसाला, घरी बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

Maggi Masala: जेवण आणखी टेस्टी बनवते मॅगी मसाला, घरी बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

Jul 08, 2024 10:32 PM IST

Maggi Masala Recipe: घरच्या घरी मॅगी समाला बनवण्यासाठी खडा मसाल्याचाच वापर केला जातो. तुम्हाला घरी मॅगी मसाला बनवायचा असेल तर ही रेसिपी फॉलो करा.

मॅगी मसाला रेसिपी
मॅगी मसाला रेसिपी (freepik)

Market Style Maggi Masala Recipe: मॅगी खायला फक्त लहान मुलेच नाही तर मोठ्यांना सुद्धा आवडते. बेचव भाजीची चवही मॅगी मसालामुळे चटकदान बनते. त्यामुळे अनेक महिला भाजी टेस्टी बनवण्यासाठी त्यात मॅगी मसाला वापरतात. भाजीची चव वाढवण्यासाठी या मसाल्याचा वापर करणाऱ्या प्रत्येक महिलेला त्यात मॅगीचा एखादा सीक्रेट इंग्रेडियंट आहे असे वाटते. पण असे अजिबात नाही. मॅगी मसाला बनवण्यासाठी घरात वापरले जाणारे खडा मसालेच वापरले जातात. तुम्हालाही हा मसाला घरी बनवून साठवायचे असेल तर त्याची सोपी रेसिपी फॉलो करा.

मॅगी मसाला बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- ३ टेबलस्पून कांदा पावडर

- ३ टेबलस्पून लसूण पावडर

- २.५ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर

- १ टेबलस्पून साखर पावडर

- २ टेबलस्पून आमचूर पावडर

- ३ टेबलस्पून चिली फ्लेक्स

- १ टीस्पून हळद

- २ टेबलस्पून जिरे

- ३ टेबलस्पून काळी मिरी

- १ टेबलस्पून मेथी दाणे

- ३-४ संपूर्ण लाल मिरच्या

- २ टेबलस्पून धने

- २ तेजपत्ता

- दीड टीस्पून सुंठ पावडर

- मीठ चवीनुसार

मॅगी मसाला बनवण्याची पद्धत

मार्केटसारखी मॅगी मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम जिरे, मेथी दाणे, तमालपत्र, धने, लाल मिरची, काळी मिरी कमीत कमी २ तास उन्हात ठेवा. असे केल्याने खडा मसाल्यांमध्ये असलेला ओलावा दूर होईल. आता मध्यम आचेवर कढई गरम होण्यासाठी ठेवा. ते गरम झाल्यावर त्यात सर्व उन्हात वाळवलेले खडा मसाले घालून मंद आचेवर ४-५ मिनिटे परतून घ्या. यानंतर हे मसाले एका प्लेटमध्ये काढून थंड करा. हे खडा मसाला थंड झाल्यावर बारीक करून त्याची पावडर तयार करा. आता या मसाल्यात कांदा पावडर, लसूण पावडर, कॉर्न फ्लोअर, आमचूर पावडर, बारीक केलेली साखर, सुंठ पावडर, हळद, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून पुन्हा एकदा सर्व मसाले बारीक करून घ्या. 

आता हे मसाले चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. तुमचा मॅगी मसाला तयार आहे. एअर टाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा.

Whats_app_banner