Holi Papad Recipe: होळीसाठी बनवा बटाट्याचे पापड, मार्केटसारखे टेस्ट देईल ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Papad Recipe: होळीसाठी बनवा बटाट्याचे पापड, मार्केटसारखे टेस्ट देईल ही रेसिपी

Holi Papad Recipe: होळीसाठी बनवा बटाट्याचे पापड, मार्केटसारखे टेस्ट देईल ही रेसिपी

Mar 19, 2024 05:30 PM IST

Papad Recipe for Holi: घरी बनवलेले बटाट्याचे पापड अनेकदा काळे होतात आणि तळल्यावर कडक राहतात. पण तुम्ही या सिक्रेट रेसिपीने बटाट्याचे पापड बनवले तर ते मार्केटसारखे बनवतील. जाणून घ्या रेसिपी.

बटाट्याचे पापड
बटाट्याचे पापड

Potato Papad Recipe: अनेक ठिकाणी होळी साजरी करण्यासाठी पार्टीचे आयोजन केले जाते. अशा वेळी पार्टीसाठी विविध पदार्थ बनवले जातात. अनेक स्त्रिया घरी वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवायला लागतात. विशेषत: बटाट्याचे पापड जवळपास प्रत्येक घरात बनतात आणि सर्वांनाच आवडतात. पण बटाट्याचे पापड बनवल्यानंतर ते अनेकदा काळे पडतात आणि तळल्यानंतर कडक होतात. बाजारात मिळणारे पांढरे आणि कुरकुरीत बटाट्याचे पापड घरी सुद्धा बनवता येतात. यासाठी ही सिक्रेट रेसिपी पाहा. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही बटाट्याचे पापड बनवले तर ते सर्वांना आवडतील.

बटाट्याचे पापड बनवण्यासाठी साहित्य

- १ किलो बटाटा

- २०० ग्रॅम आरारोट पावडर

- बारीक चिरलेली कोथिंबीर

- बारीक केलेली लाल मिरची किंवा लाल तिखट

- चवीनुसार मीठ

- २ ते ३ चमचे जिरे

- आवडीनुसार मसाला

बटाट्याचे पापड बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम बटाटे उकळून घ्या. हे बटाटे गरम असतानाच सोलून त्याचे दोन ते तीन भाग करा. आता हे बटाटे पूर्णपणे थंड झाल्यावर या बटाट्यांमध्ये मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, ठेचलेली लाल मिरची किंवा लाल तिखट आणि जिरे घाला. तुम्हाला हवे असल्यास तुमच्या आवडीनुसार धनेपूड, ओवा, काळी मिरी किंवा मसाले घालू शकता. आता हे मसाले घालून हाताने चांगले मॅश करा. बटाटे मॅश झाल्यावर या मिश्रणात आरारोट पावडर घाला आणि हाताने चांगले मिक्स करा. बटाट्याचे मिश्रण मऊ पिठासारखे मळून घ्यावे. आता पॉलिथिन पसरवून थोडे तेल लावून पापड मशिनच्या मदतीने दाबून सपाट करा. जेणेकरून पापड एकसारखे आणि पातळ होईल. हे तयार पापड पॉलिथिनवर पसरवा आणि सुकल्यावर उलटे करा. पापड पहिले हलक्या उन्हात वाळवून नंतर सावलीत वाळवा. तुमचे बटाट्याचे पापड तयार आहे. ते तळून पाहुण्यांना सर्व्ह करा.

Whats_app_banner