मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Manuka Laddo: हिवाळ्यात बनवा मनुक्याचे लाडू, मिळेल शरीराला देतील ऊब, जाणून घ्या रेसिपी!

Manuka Laddo: हिवाळ्यात बनवा मनुक्याचे लाडू, मिळेल शरीराला देतील ऊब, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 04, 2024 01:03 PM IST

Healthy Winter Food: हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ खाणे गरजेचे असते. थंडीत उबदारपणा देणारे लाडू आवर्जून खायला हवेत.

kismish laddu
kismish laddu (freepik)

Winter Special Recipe: हिवाळा म्हंटल की आवर्जून अनेक पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ आपले आपलं शरीर उबदार ठेवायला मदत करतात. थंडीत अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात. हे लाडू टेस्टी आणि हेल्दी असतात. मेथीचे, डिंकांचे लाडू खाल्ले असतील. पण कधी तुम्ही मनुक्याचे लाडू (Raisins Laddu)खाल्ले आहेत का? नसेल तर आम्ही तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहोत. मनुका लाडू शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करतात.हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करते आणि अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यात मदत होते. सर्दी-खोकला सारखे आजार यामुळे बरे होतात. हे इम्युनिटी बूस्टर लाडू आहेत. चला तर मग आज जाणून घेऊया मनुक्याचे लाडूची रेसिपी. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि ते खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याची रेसिपी.

जाणून घ्या रेसिपी

मनुका लाडू बनवण्यासाठी मनुका बारीक करून घ्या आणि इतर ड्रायफ्रुट्सही भाजून घ्या. आता हे भाजलेले ड्रायफ्रुट्स बारीक करून घ्या. नंतर वेलची बारीक करून बाजूला ठेवा. आता एका कढईत थोडं तूप ठेवा आणि नंतर त्यात गूळ घाला. गूळ वितळल्यानंतर त्यात मनुका आणि इतर ड्रायफ्रुट्स टाका. वेलची पूड घाला आणि वर थोडे तूप घाला. यानंतर गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर हलक्या हातांनी पीठ घ्या आणि लाडू बांधायला सुरुवात करा. गोलाकार करून एका पेटीत ठेवा. सर्व लाडू तयार झाल्यावर एका काचेच्या बरणीत बंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवा. रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये याची काळजी घ्या. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात मनुका लाडू खाऊ शकता.

असं करावे सेवन

उत्तम आरोग्यासाठी हे लाडू तुम्ही दररोज दुधासोबत खाऊ शकता. हे चवदार आणि आरोग्यदायी देखील आहे.

WhatsApp channel