मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mango Jam: घरच्या घरी झटपट बनवा आंबट गोड मँगो जॅम, मुलांसह मोठ्यांना आवडेल ही रेसिपी

Mango Jam: घरच्या घरी झटपट बनवा आंबट गोड मँगो जॅम, मुलांसह मोठ्यांना आवडेल ही रेसिपी

May 21, 2024 12:00 AM IST

Summer Special Recipe: तुम्हाला मुलांसाठी त्यांची आवडती मँगो डिश बनवायची असेल तर मँगो जॅमची ही चविष्ट रेसिपी फॉलो करा.

मँगो जॅमची रेसिपी
मँगो जॅमची रेसिपी

Mango Jam Recipe: उन्हाळा सुरू होताच आंब्याच्या अनेक जाती बाजारात उपलब्ध होतात. हाच ऋतू म्हणजे घरातील महिला आंब्याच्या साहाय्याने आमचूर पावडर, मुरांबा, लोणचे, जाम असे विविध पदार्थ तयार करून वर्षभर साठवून ठेवतात. मुलांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना पोळी किंवा ब्रेडवर आंब्याचा जाम लावून खायला आवडचे. तुम्हालाही मुलांसाठी त्यांची आवडती मँगो डिश बनवायची असेल, तर मँगो जॅमची ही चविष्ट रेसिपी फॉलो करा. ही बनवायला सोपी आणि झटपट तयार होते.

ट्रेंडिंग न्यूज

मँगो जाम बनवण्यासाठी साहित्य

- १ कप कच्चा आंबा किंवा कैरी

- ३ कप पिकलेला आंबा

- १/२ कप ब्राऊन शुगर

- १ टीस्पून बडीशेप

- ४ ते ५ लहान वेलची

मँगो जॅम बनवण्याची पद्धत

मँगो जॅम बनवण्यासाठी प्रथम १ कप कैरी आणि त्याच्या तिप्पट प्रमाणात पिकलेल्या आंबा घ्या आणि ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा. यानंतर ब्राऊन शुगर, आणि छोटी वेलची पावडर घालून बारीक करा. यानंतर तयार प्युरी एका कढईत काढून मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे शिजवा. प्युरी एक तृतीयांश घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. प्युरी घट्ट होईपर्यंत शिजवायची आहे याची विशेष काळजी घ्या. आता तयार प्युरी थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवा. तुमचा चविष्ट मँगो जॅम तयार आहे. 

मँगो जॅममध्ये हलका आंबटपणा घालायचा असेल तर त्यात लिंबाचा रस घाला. तयार केलेला मँगो जॅम पराठा, टोस्ट आणि कस्टर्डमध्ये घालून खाऊ शकता.

WhatsApp channel
विभाग