Malai Laddu Recipe: भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण यावर्षी १९ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी त्यांना वचन देतात, तर बहिणी भावाचे तोंड गोड करण्यासाठी त्यांना मिठाई खाऊ घालतात. जर तुम्हाला तुमच्या भावासाठी या रक्षाबंधनाला बाजारातील मिठाई न आणता घरी मिठाई बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टेस्टी मलाई लाडू रेसिपी फॉलो करू शकता. ही रेसिपी खायला खूप चविष्ट आणि बनवायला खूप सोपी आहे.
- दूध - २ लिटर
- मलाई - १/४ कप
- कन्डेन्स्ड मिल्क - ३/४ कप
- मिल्क पावडर - ३/४ कप
- तूप - १ टीस्पून
- लिंबाचा रस - २ चमचे
- वेलची पूड - १/२ चमचा
- साखर - चवीनुसार
मलाई लाडू बनवण्यासाठी प्रथम अर्धा कप दूध काढून बाजूला ठेवावे. यानंतर उरलेल्या दुधात लिंबाचा रस घालून दुधातून पनीर काढून घ्या. आता पनीर मलमलच्या कापडात ठेवा. यानंतर एका भांड्यात दूध, मलई आणि तूप घालून मंद आचेवर चांगले मिक्स करावे. यानंतर मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात मिल्क पावडर, पनीर, साखर आणि कन्डेन्स्ड मिल्क घालून मिक्स करा. आता वेलची पूड घाला आणि मिक्स करावी. आता तयार केलेले मिश्रण हातात घेऊन त्याचे लाडू बांधून एका प्लेटमध्ये बाजूला ठेवा.
त्याचप्रमाणे सर्व मिश्रणांपासून लाडू तयार करा. चवदार मलाईचे लाडू तयार आहेत. तुम्ही हे फ्रिजमध्ये थंड करून देखील खाऊ शकता.