मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makhana Dosa: दिवसाची सुरुवात करा 'मखाणा डोसा'ने, कोलेस्ट्रॉल आणि साखर राहिल नियंत्रित!

Makhana Dosa: दिवसाची सुरुवात करा 'मखाणा डोसा'ने, कोलेस्ट्रॉल आणि साखर राहिल नियंत्रित!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 18, 2024 09:29 AM IST

Breakfast Recipe: तुम्हाला सकाळी हेल्दी नाश्ता करायचा असेल तर तुम्ही मखाणा डोसा है उत्तम पर्याय आहे. मखाणा डोसा बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.

how to make Makhana Dosa
how to make Makhana Dosa (freepik)

Healthy Breakfast Recipe: नाश्त्यासाठी काय करायचं? हा नेहमीचाच प्रश्न आहे. दिवसाची सुरुवात नेहमी हेल्दी पदार्थाने व्हावी असं सगळ्यांचं वाटत. पण नक्की काय बनवावं हे समजत नाही. अशा वेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मखाणा हा आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. जर तुम्ही दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने केली तर आजार तुमच्या जवळ येणार नाहीत. तुम्ही तांदूळ आणि डाळीपासून बनवलेला डोसा खाल्ला असेल. पण तुम्ही कधी मखाणा डोसा खाल्ला आहे का? असा डोसा खाल्ला नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी मखाणा डोसा रेसिपी घेऊन आलो आहोत. मखाणा शरीर निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहे. जर तुम्ही दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने केली तर तुम्ही आजारी पडणार नाही. मखाणा केवळ रक्तातील साखर नियंत्रित करत नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. म्हणूनच याचा ब्रेकफास्ट बनवणे उत्तम ठरू शकते. जर तुम्हालाही पौष्टिक नाश्ता करायचा असेल तर मखाणा डोसा कसा बनवायचा ते जाणून घेऊयात..

लागणारे साहित्य

१ कप मखना

२/३ कप रवा

१/२ कप पोहे

मीठ - चवीनुसार

१ कप पाणी

३ चमचे दही

तेल - आवश्यकतेनुसार

Baby Corn Soup Recipe: हिवाळ्यात बेबी कॉर्न सूप आहे फायदेशीर, जाणून घ्या रेसिपी!

जाणून घ्या कृती

मखाणा डोसा बनवण्यासाठी प्रथम मखाणा घ्या आणि १५-२० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा, ठरलेल्या वेळेनंतर मखाणा पाण्यातून काढून टाका. आता भिजवलेले १/२ कप पोहे आणि २/३ कप रवा घाला. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात हिरवी मिरची, ३ मोठे चमचे दही, हिरवी धणे, मिरपूड आणि चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घाला. यानंतर हे मिश्रण मिसळून द्रावण तयार करा.आता हे मिश्रण एका भांड्यात ठेवा आणि त्यात अर्धा चमचा तूप आणि बेकिंग सोडा टाका आणि १ मिनिट नीट फेटून घ्या, त्यानंतर मिश्रण झाकून ठेवा आणि १० मिनिटे ठेवा. आता एक नॉनस्टिक पॅन घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा. पुन्हा एकदा मखाणा पिठ/मिश्रण फेटून घ्या.

तवा गरम झाल्यावर भांड्यातून मखाणाचे पीठ तव्यावर डोस्यासारखे पसरून भाजून करा. त्याचा रंग सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर ते घडी करून प्लेटमध्ये काढा. तुमचा मखाणा डोसा तयार आहे. आवडत्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

WhatsApp channel