Healthy Breakfast Recipe in Marathi: उकडणे, ग्रिलिंग आणि भाजणे या पद्धतीने स्वयंपाकाच्या आरोग्यदायी पद्धती मानल्या जातात. परंतु या पद्धती वापरून बनवलेल्या पदार्थांना तेवढी चटकदार चव नसते. पण आम्ही एक हटके रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला उकडण्याच्या अशा पद्धतीबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमची डिश अजून चॅन होईल. आम्ही अशा दिशाबद्दल सांगत आहोत, जी केवळ चवीनुसारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हा बिहारचा पारंपारिक पदार्थ आहे. याच नाव आहे दाल पिठा, ज्याला फरा असेही म्हणतात. तांदळाचे पीठ आणि डाळीपासून बनवलेला हा पदार्थ तुम्ही नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत आणि संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. चला जाणून घेऊयात कशी बनवायची ही डिश..
१ १/२ कप तांदूळ, १ टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि १ टीस्पून तेल, १ कप चणाडाळ, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून किसलेले आले, ३-४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ टीस्पून हळद, २ टीस्पून भाजलेले जिरे, १/२ टीस्पून आमचूर पावडर , २ चमचे तेल आणि चवीनुसार मीठ
> सर्वप्रथम चणा डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या घालून बारीक करा. खूप गुळगुळीत पेस्ट बनवू नका. किंचित खडबडीत ठेवता येते. हिरव्या भाज्यांचा हंगाम असल्याने त्यात तुम्ही हिरव्यागार लसणाची पानेही वापरू शकता.
> कढईत पाणी गरम करा. त्यात तांदळाचे पीठ, काळी मिरी आणि एक चमचा तेल घाला. तांदळाचे पीठ सर्व पाणी शोषून घेईपर्यंत सतत ढवळत रहा. यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून हलकेच मळून घ्या.
> या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात हरभरा डाळीचे मिश्रण भरा.
> स्टीमर असेल तर उत्तम, नाहीतर कढईत पाणी गरम करून त्यात पीठ गाळण्यासाठी चाळणी ठेवावी आणि त्यावर हे पिठे सेट करावेत. वरचे झाकण ठेवा आणि किमान १०-१५ मिनिटे शिजू द्या.
> असे सर्व डाळ पिठा तयार करून घ्या. नंतर कढईत कढीपत्ता आणि मोहरी टाका आणि त्यात हे पिठा परतून घ्या.
> हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)