Fenugreek and Milk Hair Mask: उन्हाळ्यात त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. या काळात सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे केस खूप कोरडे आणि निर्जीव होतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आहाराची काळजी घेण्यासोबतच हेअर केअरकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. केसांच्या वाढीसाठी हेअर मास्क खूप फायदेशीर मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही घरी बनवलेले हेअर मास्क वापरू शकता. मेथीच्या दाण्यांपासून बनवलेला हा जादुई हेअर मास्क कसा बनवायचा आणि त्याचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या.
- मेथी दाणे
- दूध
- एलोवेरा जेल
- खोबरेल तेल
हा हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम एका वाटीत मेथीचे दाणे घ्या. नंतर ते आवश्यक तेवढ्या पाण्यात भिजवा. हे रात्रभर भिजवून ठेवल्यानंतर सकाळी त्यात दूध घालून ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा. पेस्ट तयार झाल्यावर त्यात एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल घाला. हे चांगले मिक्स करा. तुमचा हेअर मास्क तयार आहे.
जर तुम्ही केसांच्या वाढीसाठी हा हेअर मास्क लावत असाल तर आधी केस धुवा. हे सर्वात महत्वाचे आहे जेणेकरून टाळूमध्ये अडकलेली घाण बाहेर काढता येईल. केस थोडेसे ओले असतील तेव्हा हा पॅक पूर्ण टाळूवर आणि केसांच्या लांबीवर लावा. हा हेअर मास्क नीट लावल्याची खात्री करा. आता कमीत कमी ३० मिनिटे हा हेअर मास्क केसांवर राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या