मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lobia kabab Recipe: ब्रेकफास्टसाठी बनवा प्रथिनेयुक्त चवळीचे कबाब! नोट करा स्वादिष्ट रेसिपी

Lobia kabab Recipe: ब्रेकफास्टसाठी बनवा प्रथिनेयुक्त चवळीचे कबाब! नोट करा स्वादिष्ट रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 24, 2023 12:29 PM IST

Health Care: प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम युक्त चवळीचे कबाब एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटेल.

चवळीचे कबाब
चवळीचे कबाब (Freepik )

नाश्त्यात गरमागरम कबाब खायला मिळाले तर दिवस छान बनतो. कबाबचे नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. तुम्ही बटाटे, मटार, केळी इत्यादीपासून बनवलेले कबाब खाल्ले असतील, पण चवळीपासून बनवलेले कबाब तुम्ही कधी चाखले आहेत का? जर तुम्ही खाल्ले नसेल तर नाश्त्यात एकदा चवळीपासून बनवलेले कबाब करून पहा. प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम युक्त चवळीचे कबाब एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटेल. तथापि, बहुतेक लोकांना चवळी आवडत नाही. पण जर तुम्ही एकदा चवळीचे कबाब बनवून खाल तर तुम्हालाही चवीला आवडू लागेल. चला जाणून घेऊया चवळी कबाब बनवण्याची रेसिपी.

चवळी कबाब बनवण्यासाठी साहित्य

बटाटा - १

चवळी - १ कप

हिरवी मिरची - २

कांदा - १

आले - एक तुकडा

कोथिंबीर - थोडी बारीक चिरून

जिरे - अर्धा टीस्पून

मीठ - चवीनुसार

गरम मसाला - १ टीस्पून

लाल तिखट - १/२ टीस्पून

धने पावडर - १/४ टीस्पून

तेल - आवश्यकतेनुसार

चाट मसाला - १/२ टीस्पून

चवळी कबाब बनवण्याची कृती

> एका भांड्यात चवळी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते कुकरमध्ये देखील उकडू शकता, परंतु ते शिजवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

> बटाटे उकळून, सोलून मॅश करा. अशाच प्रकारे चवळी उकडली की एका भांड्यात टाका आणि चांगले मॅश करा.

> कांदे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले धुवून बारीक कापून एका भांड्यात ठेवा.

> गॅसवर तवा ठेवा. त्यात एक चमचा तेल टाका. आता त्यात जिरे टाका आणि तडतडू द्या.

> नंतर त्यात कांदा, आले, हिरवी मिरची घालून परतून घ्या.

> ते सोनेरी तपकिरी रंगाचे झाल्यावर त्यात मॅश केलेला चवळी घाला. नीट ढवळून घ्यावे जेणेकरून ते पॅनला चिकटणार नाही.

> आता बटाटे घालून परतावे. एक मिनिटानंतर लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, चाट मसाला असे सर्व मसाले घालून मिक्स करा. मसाले चवीनुसार कच्चे राहू नयेत, म्हणून काही मिनिटे शिजवा.

> आता गॅस बंद करून त्यात चिरलेली कोथिंबीर टाका. चवळीचे हे मिश्रण थंड होऊ द्या. आता या मिश्रणापासून लहान आकाराचे कबाब बनवून प्लेटमध्ये ठेवा.

> सेट होण्यासाठी १५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून कबाब बेक करताना तुटणार नाहीत. कढईत तेल टाकून ५-६ कबाब एकत्र ठेवून मंद आचेवर बेक करावे.

> दोन्ही बाजूंनी तपकिरी रंग आल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या.

> टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम खाण्याचा आनंद घ्या. पोषक तत्वांनी भरलेले हे कबाब तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतील.

WhatsApp channel

विभाग