
Litchi Ice Cream Recipe: उन्हाळ्यात आंब्यानंतर जे फळ लोकप्रिय आहे ते म्हणजे लिची. लिची खायला कोणाला आवडत नाही? लहान मुले असो वा मोठे लिचीची आंबट गोड चव सर्वांनाच आवडते. हल्ली बाजारात लिची आईस्क्रीमचाही चांगलीच क्रेझ आहे. आता तुम्हीही लिची आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता. त्याची चव लिचीप्रमाणेच अतिशय अप्रतिम आणि रिफ्रेशिंग असते. आज आम्ही तुम्हाला त्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी फॉलो करून तुम्ही घरच्या घरी लिची आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता.
घरच्या घरी मार्केटसारखे लिची आईस्क्रीम बनवण्यासाठी जास्त मटेरियलची गरज नसते. त्यासाठी २५-३० लिची, दोन कप फुलक्रीम दूध, अर्धा कप दूध पावडर, दोन चमचे कॉर्न फ्लोर, थोडी क्रीम किंवा दुधाची साय, एक कप कन्डेन्स्ड मिल्क आणि साखर लागेल. आपण हवे असेल तर तुम्ही चवीसाठी व्हॅनिला एसेन्स किंवा लिची एसेन्स देखील वापरू शकता.
घरी लिची आईस्क्रीम बनवणे अतिशय सोपे आहे. सर्वप्रथम लिची सोलून त्याचे लहान तुकडे करा. आता एका भांड्यात दूध घेऊन त्यात दूध पावडर घाला. आता यानंतर थोडे कॉर्न फ्लोर घाला. हे सर्व साहित्य चांगले मिक्स करा. हे थंड दुधातच करावे लागेल हे लक्षात ठेवा. आता मंद आचेवर ठेवून शिजवून घ्या. ते सतत ढवळत राहावे हे लक्षात ठेवा. काही मिनिटांतच हे मिश्रण घट्ट होण्यास सुरवात होईल, घट्ट होताच गॅसवरून काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
आता मिश्रण थंड झाल्यावर लिची मिक्सरमध्ये बारीक करून त्यात हे दुधाचे मिश्रण मिक्स करा. आता एका बाऊलमध्ये फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय घेऊन फेटून घ्या. त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क घालून चांगले मिक्स करा. आता त्यात कंडेंस्ड मिल्क आणि लिचीचे मिश्रण घाला. तुम्हाला हवे असेल तर चवीसाठी व्हॅनिला किंवा लिची एसेन्स देखील घालू शकता. आता हे सर्व मिश्रण एका कंटेनरमध्ये ठेवा. हवं असेल तर कापलेल्या लिचीने सजवू शकता. आता सुमारे १२ ते १५ तास फ्रिजमध्ये ठेवा. तुमचे टेस्टी आणि रिफ्रेशिंग लिची आईस्क्रीम तयार आहे.
संबंधित बातम्या
