मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lipstick Hacks: दिवसभर लिपस्टिक टिकावी असं वाटतंय? या टिप्स फॉलो करा!

Lipstick Hacks: दिवसभर लिपस्टिक टिकावी असं वाटतंय? या टिप्स फॉलो करा!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 23, 2024 11:26 AM IST

Makeup Tips: सकाळी लावलेली लिपस्टिक काही वेळातच निघून जाते. अशावेळी जास्त वेळी लिपस्टिक टिकण्यासाठी काय करता येईल याबद्दल जाणून घेऊयात.

how to make lipstick last all day
how to make lipstick last all day (Freepik)

Lipsticks hacks: ओठ सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक लावली जाते. कॉलेजला जाणाऱ्या मुली ते ऑफिसला जाणाऱ्या मुली सगळेच आवर्जून लिपस्टिक (Beauty Tips) लावतात. मुलींच्या मेकअपचा हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय मेकअप पूर्ण होत नाही. बाकीचा मेकअप केला नाही तरी अनेक महिला लिपस्टिक तरी लावतात. पण मुलींना एक समस्या भेडसावते ती म्हणजे ती ओठांवर जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. या अशा टिप्स आहेत ज्याद्वारे तुमची लिपस्टिक तुमच्या ओठांवर जास्त काळ टिकून राहू शकते. चला जाणून घेऊयात टिप्स..

कशी लावायची लिपस्टिक?

अनेक महिला लिपस्टिकचा एकच स्ट्रोक लावतात. पण हे लक्षात घ्या की लिपस्टिकचा एक स्ट्रोक पुरेसा ठरत नाही. तुमची आवडती लिपस्टिक ओठांवर जास्त काळ टिकून राहावी यासाठी मॉइश्चरायझेशन, लिप लाइनर, बेस लिपस्टिक लावायच्या आधी लावणे हे तितकेच महत्त्वाचे आहे.

या टिप्स लक्षात ठेवा

> ओठांवरची कोरडी त्वचा काढून टाकण्यासाठी आठवड्यातून दोनदा ओठांना एक्सफोलिएट करा.

> लिपस्टिक लावण्यापूर्वी हायड्रेटिंग बाम किंवा लिप प्राइमर लावा. यामुळे लिपस्टिक जास्त काळ टिकेल.

> लिपस्टिक नेहमी दोन कोटमध्ये लावा. मॅट फिनिशिंगसाठी त्यावर सेटिंग पावडर लावा.

या मेकअप टिप्स फॉलो करा

> तुमच्या नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी फक्त एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात टूथपेस्ट आणि सोडा मिक्स करा. त्यानंतर टूथब्रशच्या मदतीने नाकावर लावा. आता ५ मिनिटे असेच राहू द्या. नंतर काही वेळाने धुवा.

> तुमच्या स्किन शेडपेक्षा हलक्या शेडचा फाउंडेशन वापरावा. याशिवाय तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर हलका कंसीलर वापरा आणि ते चांगले मर्ज करून घ्या.

> जर तुमचे नाक तेलकट असेल तर नाकाच्या पट्ट्या वापरा. ते बाजारात सहज उपलब्ध होईल. ते वापरल्यानंतर १५ दिवसांनी तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतील. ते तुमच्या नाकातील अतिरिक्त तेल शोषून घेते.

> नेहमी चेहऱ्यावर प्राइमर, कन्सीलर, फाउंडेशन लावण्याऐवजी तुम्ही बीबी किंवा सीसी क्रीम वापरू शकता. यामुळे तुमचा वेळ वाचेल.

> मस्करा लावणे हे सर्वात कठीण काम आहे. ज्यांनी नवीन मेकअप करायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी ते लावणे एक समस्या बनते. अशा परिस्थितीत तुमच्या पापण्या जाड दिसण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल लावू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

विभाग