Summer Skin Care Tips: कडक उन्हाळा सुरु आहे. घाम, चिपचिप आणि कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. पाणी कमी झाल्याने चेहरा नेहमी निस्तेज होतो. या टॅनमुळे चेहऱ्यावर डाग, मुरुम, पिंपल आणि फ्रिकल्स येण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. यामुळे सगळ्यांचं या टॅनिंगपासून सुटका मिळवायची असते. यासाठी तुम्ही बाहेरचे उत्पादने वापरण्याची गरजेचे नाही. हट्टी टॅनपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही मसूर वापरू शकता. कडधान्य हे असे अन्नपदार्थ आहे ज्याशिवाय आपले अन्न पूर्ण होऊ शकत नाही. मसूर डाळीमध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने तुमचे आरोग्य तर सुधारतेच पण त्यामुळे तुमचे सौंदर्यही वाढते. मसूर त्वचेवरील डाग दूर करून ती उजळण्यास मदत करतात. खरंतरं, यामध्ये असलेले अँटी-एजिंग गुणधर्म तुमच्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी खूप प्रभावी आहेत. जर तुमच्या चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या किंवा काळे डाग असतील तर मसूरचा फेस पॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. चला हा पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.
अर्धा कप दूध, ४ चमचे मसूर डाळ, २ चमचे चंदन, अर्धा चमचा हळद, लिंबाचा रस.
सर्वात आधी, अर्धा कप दुधात ४ चमचे मसूर घाला आणि चार तास भिजवा. ठरलेल्या वेळेनंतर डाळी आणि दुधाचे हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. आता एका भांड्यात पेस्ट काढा आणि त्यात अर्धा चमचा हळद आणि २ चमचे चंदन आणि लिंबाचा रस घाला. तुमचा फेस पॅक तयार आहे आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि हातपायांवर लावा. ही पेस्ट २० ते २५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा लावा. या पॅकमुळे तुमच्या त्वचेला आणि शरीराला फक्त १ आठवड्यात आश्चर्यकारक चमक मिळेल. हा पॅक लावल्याने डाग तर दूर होतातच पण टॅन कमी होण्यासही मदत होते. याशिवाय चेहऱ्याच्या त्वचेचा रंगही स्पष्ट होऊ लागतो. तुम्ही ही पेस्ट ४ ते ५ दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)