Lauki Tomato Sabji Recipe: दुधी भोपळ्याची भाजी सर्व घरांमध्ये केली जाते. लहान मुलेच नाही तर मोठे सुद्धा ही भाजी खाण्याचा कंटाळा करतात. पण टोमॅटोसोबत दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर त्याची चव दुप्पट होते. दुधी भोपळा आणि टोमॅटो एकत्र चविष्ट लागतात. तुम्ही ही रेसिपी फॉलो करून दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर मोठ्यासोबतच लहान मुले सुद्धा आवडीने खातील. चला तर मग नेहमीची दुधी भोपळ्याची भाजी न बनवता यावेळी ट्राय करा टोमॅटो आणि दुधी भोपळ्याची टेस्टी भाजी. हे कसे बनवायचे ते जाणून घ्या.
- दुधी भोपळा - एक मध्यम आकाराचा
- टोमॅटो - २ मध्यम आकाराचे
- चवीनुसार मीठ
- दही
- लाल तिखट - अर्धा टीस्पून
- हळद - अर्धा टीस्पून
- धने पावडर - अर्धा टीस्पून
- अख्खी लाल मिरची - २
- हिंग - दोन चिमूटभर
- तूप - ३ टेबलस्पून
- कोथिंबीर - मूठभर
ही भाजी बनवण्यासाठी आधी दुधी भोपळा नीट धुवा आणि नंतर नीट पुसून वाळवा. आता ते सोलून त्याचे छोटे तुकडे करा. आता टोमॅटो नीट धुवून त्याचे बारीक तुकडे करा. कुकर घेऊन मध्यम आचेवर तूप घालून गरम होऊ द्या. तूप गरम केल्यानंतर त्यात प्रथम मोहरी, हिंग आणि अख्खी लाल मिरची घालून तडतडून घ्या. नंतर त्यात टोमॅटो घाला. आता टोमॅटो चांगले वितळू द्या. आता त्यात सर्व मसाले टाका आणि किमान ५ ते १० मिनिटे मसाले शिजवा. या वेळी आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला. मसाले नीट भाजल्यानंतर त्यात दही घाला.
आता त्यात दुधी भोपळ्याचे तुकडे घाला. नीट मिक्स करून कुकरचे झाकण बंद करा. साधारण २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कुकरचा प्रेशर स्वतः सुटू द्या. तुमची भाजी तयार आहे. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.