Dudhi Bhopla Laddu Recipe: दुधी भोपळा एक अशी भाजी आहे जी बहुतेक लोकांना खायला आवडत नाही. या भाजीचे नाव ऐकताच मुले नाक मुरडायला लागतात. पण तुम्हाला माहित आहे का दुधी भोपळा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? दुधी भोपळ्यामद्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक यांसारखे पौष्टिक गुणधर्म असतात. काही लोक यापासून हलवा देखील बनवतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की तुम्ही दुधी भोपळ्यापासून चविष्ट लाडू देखील तयार करू शकता. उन्हाळ्यात थंड दुधी भोपळ्याचे लाडू चवीला अप्रतिम लागतात. विशेष म्हणजे मोठ्यांसोबतच लहान मुले सुद्धा हे लाडू आवडीने खातील. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या दुधी भोपळ्याच्या लाडूची रेसिपी.
- ५०० ग्रॅम दुधी भोपळा
- ५ चमचे तूप
- २५० ग्रॅम साखर किंवा खडी साखर
- १/२ कप किसलेले खोबरे
- दोन चमचे काजू
- दोन चमचे बदाम
- दोन चमचे पिस्ता
- दोन चमचे वेलची
दुधी भोपळ्याचे लाडू बनवण्यासाठी आधी दुधी भोपळा धुवून त्याची साल काढून टाकावी. नंतर दुधी भोपळा किसून घ्या. नंतर किसलेला दुधी भोपळा हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका. आता कढईत तूप टाकून गरम होऊ द्या. तूप गरम झाल्यावर त्यात किसलेला दुधी भोपळा घाला आणि चमच्याने ढवळून ३-४ मिनिटे परतून घ्या. हे भाजून झाल्यावर त्यात साखर घालून पाणी सुकेपर्यंत परतून घ्या. आता सर्व ड्राय फ्रुट्स जाडसर बारीक करून घ्या. नंतर हे ड्राय फ्रूट्स दुधी भोपळ्यात घालून मिक्स करा. गॅस बंद करून भाजलेला दुधी भोपळा थंड होऊ द्या.
ते थंड झाल्यावर त्यात किसलेले खोबरे आणि वेलची पूड घाला. आता हाताला तूप लावून लाडू तयार करा. तुमचे टेस्टी दुधी भोपळ्याचे लाडू तयार आहे.