Kesari Bhaat: जेवणानंतर काहीतरी गोड खायला आवडते? ट्राय करा केशरी भातची रेसिपी-how to make kesari bhaat or kesariya bhaat recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kesari Bhaat: जेवणानंतर काहीतरी गोड खायला आवडते? ट्राय करा केशरी भातची रेसिपी

Kesari Bhaat: जेवणानंतर काहीतरी गोड खायला आवडते? ट्राय करा केशरी भातची रेसिपी

Aug 30, 2024 09:22 PM IST

Sweet Recipe: तुम्हाला सुद्धा जेवण केल्यानंतर गोड पदार्थ खायला आवडत असेल तर यावेळी केशरी भातची ही रेसिपी नक्की ट्राय करा.

kesari bhaat: केशरी भातची रेसिपी
kesari bhaat: केशरी भातची रेसिपी (freepik)

Kesariya Bhaat Recipe: अनेक लोकांना रात्री जेवणानंतर काहीतरी स्वीट डिश खायला आवडते. रोज मिठाई बनवणे शक्य नसते. तुम्हाला सुद्धा गोड खायला आवडत असेल तर पण काय बनवायचे हे कळत नसेल तर केशरी भात बनवू शकता. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. या रेसिपीची विशेषता म्हणजे याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते. चला तर मग जाणून घेऊया केशरी भात किंवा केसरिया भात कसे बनवायचे.

केशरी भात बनविण्यासाठी साहित्य

- १ कप बासमती तांदूळ

- ३/४ कप साखर

- २ टेबलस्पून देशी तूप

- ५-६ कप पाणी

- १ तमालपत्र

- २ लवंग

- १ टेबलस्पून बदाम कापलेले

- १ टेबलस्पून काजू कापलेले

- ४ हिरव्या वेलचीची पूड

- १५ केशर धागे

- १ चिमूटभर पिवळा खाण्याचा रंग

केशरी भात बनवण्याची पद्धत

केशरी भात बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ नीट धुवून अर्धा तास भिजत ठेवावा. आता एका बाऊलमध्ये दूध, केशर आणि पिवळा रंग घालून थोडा वेळ ठेवा. यानंतर वेलचीची साल काढून एका भांड्यात ठेवावी आणि काजू आणि बदामाचे ही लहान तुकडे करावेत. आता एका कढईत तूप गरम करून त्यात तमालपत्र, लवंग आणि वेलची घाला. यानंतर कढईत तांदूळ घालून उर्वरित वस्तूंसह २ मिनिटे परतून घ्यावे. तांदूळ तुपात २ मिनिटे भाजून घेतल्यानंतर कढईत पाणी घालून तांदूळ शिजण्यासाठी ठेवा. तांदूळ चांगला शिजला की तांदळाचे पाणी चाळणीतून गाळून थंड होण्यासाठी भांड्यात ठेवा.

आता दुसऱ्या कढईत तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर काजू मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत तळून घ्या. काजू तळल्यावर ते बाहेर काढून वेगळे ठेवा. आता त्याच कढईत शिजवलेल्या तांदळासोबत साखर घाला. यानंतर तांदळावर आधीच तयार केलेला केशरी रंग टाका. गॅसची फ्लेम वाढवा आणि तांदूळ मिक्स करून पाक कोरडे होऊ द्या. त्यानंतर भातात वेलची, काजू आणि बदाम घालावे. भात गॅसवरून काढून थंड होण्यासाठी ठेवा. तुमचा केशरी भात तयार आहे.

विभाग