Kesar Ubtan: चेहऱ्यावर लावा हे खास पॅक, व्हॅलेंटाईन डेच्या आधी मिळेल ग्लोइंग स्किन
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kesar Ubtan: चेहऱ्यावर लावा हे खास पॅक, व्हॅलेंटाईन डेच्या आधी मिळेल ग्लोइंग स्किन

Kesar Ubtan: चेहऱ्यावर लावा हे खास पॅक, व्हॅलेंटाईन डेच्या आधी मिळेल ग्लोइंग स्किन

Published Feb 05, 2024 11:09 AM IST

Valentine's Day: व्हॅलेंटाईन डेला खास दिसण्यासाठी तुम्ही सुद्धा तयारी सुरु केली असेल. ग्लोइंग स्किन मिळवण्यसाठी तुम्ही घरीच केशरचे हे उबटन लावू शकता. जाणून घ्या हे कसे बनवायचे.

ग्लोइंग स्किन
ग्लोइंग स्किन (unsplash)

Kesar Ubtan for Glowing Skin: त्वचेची नियमित काळजी घेतल्यास तुमचे सौंदर्य वाढते. क्लीन आणि एक्ने फ्री स्किन असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण रोजच्या धावपळीत स्वतःची काळजी घेणं अवघड असते. व्हॅलेंटाइन वीकही लवकरच सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या पार्टनरसोबत डेटवर जाण्याचे प्लॅन करताय का? तुम्हाला या दिवशी आणखी सुंदर दिसायचे असेल आणि ग्लोइंग स्किन मिळवायची असेल तर तुम्ही घरच्या घरी हा फेस पॅक बनवून लावू शकता. त्वचा फ्लॉलेस आणि ग्लोइंग बनवण्यासाठी तुम्ही हे केशरचे उबटन लावू शकता. हे पॅक लावण्याचे स्किनचे टेक्सचर सुद्धा सुधारू शकता. जाणून घ्या हे कसे बनवायचे आणि वापरावे.

हे खास उबटन बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -

- दूध पावडर

- केशर

- काजू

- पाणी

कसे बनवावे

हे उबटन बनवण्यासाठी प्रथम काजूची पेस्ट बनवा. नंतर सर्व साहित्य चांगले मिक्स करा. आता हा पॅक आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा आपले हात ओले करा आणि सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा.

योग्य पद्धतीने करा वॉश

चेहऱ्यावर उबटन सुकले की ओल्या हातांनी ते नीट चोळा. यामुळे तुमची त्वचा एक्सफोलिएट होईल. २-३ मिनिटे असे केल्यावर पॅक कोमट पाण्याने धुवा. नंतर आपली त्वचा मऊ टॉवेलने कोरडी करा आणि हायड्रेशन राखण्यासाठी हलके मॉइश्चरायझर लावा.

फायदेशीर असते उबटन

उबटन किंवा पॅक हे अतिशय चांगल्या एक्सफोलिएटरसारखे काम करते. मृत त्वचा आणि घाण काढून टाकण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. एकदा तुम्ही उबटन लावले की ते त्वचा फ्रेश, गुळगुळीत आणि तरुण बनवते. हे तयार करण्यासाठी वापरलेले घटक अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत. हे त्वचा उजळण्यास आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner