Kesar Shrikhand Recipe: गुढीपाडव्याला काही लोक पुरण पोळी बनवतात. तर काही लोक श्रीखंड आवर्जून बनवतात. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्याचे म्हटले जाते. यावर्षी ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. या दिवशी लोक विविध प्रकारचे पदार्थ बनवतात आणि सण साजरा करतात. बऱ्याच घरी या दिवशी श्रीखंड बनवले जाते. दह्याच्या मदतीने बनवले जाणारे श्रीखंड विविध प्रकारे तयार करता येते. यावेळी तुम्ही घरी केशर श्रीखंड सहज बनवू शकता. दह्यापासून बनवले जाणारे श्रीखंड खायला जेवढे टेस्टी आहे तेवढेच ते बनवायला सोपे आहे. ते कसे बनवायचे यासाठी ही रेसिपी पाहा.
- घट्ट दही
- पिठी साखर
- बदाम
- पिस्ता
- केशर
- दूध
- वेलची पावडर
केशर श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम दही सुती कपड्यात गुंडाळून ठेवावे. ते किमान ३ ते ४ तास ठेवावे लागते. एकीकडे दही ठेवल्यानंतर दुसरीकडे कोमट दुधात केशर भिजवा. केशरच्या काड्या दुधात नीट चोळा. नंतर बदाम आणि पिस्ता नीट चिरून घ्या. आता एका भांड्यात लटकलेले दही काढा आणि त्यात केशरचे दूध, पिठी साखर आणि वेलची पावडर मिक्स करा. हे नीट एकजीव होईपर्यंत मिक्स करा. तुमचे केशर श्रीखंड तयार आहे. केशर श्रीखंडच्या वर बदाम आणि पिस्ताने गार्निश करून सर्व्ह करा.
- दह्यापासून बनवलेले श्रीखंड खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- श्रीखंडमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यासही मदत होते.
- अहवालांनुसार ते मूड स्विंगच्या वेळी खाल्ले जाऊ शकते. तसं डॉक्टर रोज आहारात दही खाण्याचा सल्ला देतात.
- वजन कमी करण्यासाठी तुम्ही ते खाऊ शकता. पण वजन कमी करण्यासाठी बनवत असाल तर साखरेऐवजी गुळाचा वापर करा.