Padwa Recipe: दिवाळी पाडव्याला पतीसाठी बनवा केसर बदाम खीर, वाढवा नात्यातील गोडवा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Padwa Recipe: दिवाळी पाडव्याला पतीसाठी बनवा केसर बदाम खीर, वाढवा नात्यातील गोडवा

Padwa Recipe: दिवाळी पाडव्याला पतीसाठी बनवा केसर बदाम खीर, वाढवा नात्यातील गोडवा

Nov 13, 2023 09:45 PM IST

Diwali Padwa Sweet Recipe: दिवाळी पाडव्याला पतीसाठी काहीतरी खास पदार्थ बनवायचा विचार करत असाल ही केसर बदामची खीर बनवू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

केसर बदामची खीर
केसर बदामची खीर

Kesar Badam Kheer Recipe: दिवाळीमध्ये नवरा बायकोच्या प्रेमाचा खास दिवस म्हणजे पाडवा. यादिवशी पतीसाठी काही खास गोडधोड बनवायचा विचार करत असाल तर तुम्ही ही केसर बदामची खीर बनवू शकता. ही बनवायला खूप सोपी आहे आणि चवीलाही टेस्टी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया कशी बनवायची केसर बदाम खीर

केसर बदाम खीर बनवण्यासाठी तुम्हाला लागेल...

- दूध

- साखर

- केशर

- बदाम

- तांदूळ

- वेलची पावडर

सर बदाम खीर बनवण्याची पद्धत

खीर बनवण्यासाठी प्रथम तांदूळ भिजवा. तांदूळ किमान १ तास भिजत ठेवा. असे केल्याने खीर लवकर तयार होते. आता एका भांड्यात दूध गरम करा. मंद आचेवर उकळू द्या. दुधाला उकळी आल्यावर त्यात केशर घाला. काही वेळाने दुधात केशराचा रंग आल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ घालावे. चांगले शिजू द्यावे. आता तांदूळ व्यवस्थित शिजण्यासाठी वेळ द्या. खीर बनवत असताना बदाम भाजून घ्या आणि काही बदाम बारीक वाटून घ्या. बाकीचे बदाम बारीक चिरून घ्या. खीर शिजल्यावर त्यात साखर घाला. असे केल्यावर खीरमध्ये थोडे पाणी दिसू लागेल. अशा परिस्थितीत ते पुन्हा चांगले उकळवा. 

घट्ट झाल्यावर त्यात बदामाची पूड घालून मिक्स करा. तयार झाल्यावर गॅस बंद करून खीरला बारीक चिरलेल्या बदामांनी सजवा. केसर बदाम खीर तयार आहे.

Whats_app_banner