Kalmi Vada Recipe: चहासोबत काहीतरी चटपटीत आणि मसालेदार खावेसे वाटते. अशा परिस्थितीत डीप फ्राय केलेले स्नॅक्स खाण्याऐवजी काही हेल्दी स्नॅक्सची निवड केली पाहिजे, जे आरोग्यदायी देखील असतील. तुम्हाला सुद्धा कमी तेलात बनवलेले काही हेल्दी स्नॅक्स खायचे असेल तर हरभरा डाळीपासून तयार केलेला कलमी वडा हा चहासोबत खाण्यासाठी एक परफेक्ट स्नॅक्स आहे. तसेच ते बनवणे फार कठीण नाही. चला तर मग जाणून घ्या टेस्टी कलमी वडाची रेसिपी.
- एक कप हरभरा डाळ
- एक कप बारीक चिरलेले पालक
- तीन हिरव्या मिरच्या
- एक इंच आल्याचा तुकडा
- दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
- दोन चमचे लिंबाचा रस
- एक चमचा साखर
- दोन चमचे बडीशेप
- दीड चमचा लाल तिखट
- दोन चमचे तेल
- चवीनुसार मीठ
हा वडा बनवण्यासाठी हरभरा डाळ रात्रभर भिजत ठेवा. हरभरा डाळ चांगली फुगली की पाणी गाळून वेगळे करा. मिक्सरच्या भांड्यात हरभरा डाळ, हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा टाकून बारीक करून घ्या. लक्षात ठेवा की त्यात पाण्याचे प्रमाण नगण्य असावे. जेणेकरून पेस्ट पातळ होणार नाही. पेस्ट एका भांड्यात काढा. त्यात बारीक चिरलेला पालक घाला. कोथिंबीर, ठेचलेली बडीशेप, तिखट, साखर घालून मिक्स करा. तसेच धनेपूड, हिंग, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्स करा. मिक्स केल्यानंतर हरभरा डाळीच्या मिश्रणाला हाताच्या मदतीने आकार द्या आणि वाफेवर शिजवा. ते शिजल्यावर पातळ कापून तळून घ्या. तुमचा टेस्टी स्नॅक्स तयार आहे.