Kaddu or Bhopla Soup Recipe: हिवाळ्यात गरम पदार्थ खायला आणि प्यायला सर्वांनाच आवडतात. यात अगदी चहा- कॉफी पासून सूपपर्यंत अनेक गोष्टी आहेत ज्या हिवाळ्यात आवडीने घेतले जाते. सूप प्यायल्याने शरीर उबदार राहते. भाज्यांच्या सूपमध्ये भरपूर पोषक घटक असतात. सूप प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते, लवकर भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही सकाळी चहा कॉफीऐवजी सूप घेऊ शकता. याशिवाय अनेक लोक डिनरमध्ये सुद्धा फक्त सूप घेणे पसंत करतात. तुम्ही सूप बनवण्याचा विचार करत असाल तर भोपळ्याचे सूप बनवू शकता. भोपळ्यामध्ये कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लोह, फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. जर भोपळ्याची भाजी खायला आवडत नसेल तर त्याचे सूप बनवा. लहान मुले आणि मोठ्यांना नक्की आवडेल.
- उकळलेला भोपळा
- कांदा
- आले लसूण पेस्ट
- लाल तिखट
- काळी मिरी पावडर
- बटर
- मीठ
भोपळ्याचे सूप बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये बटर टाका. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परता. आता त्यात लसूण-आले पेस्ट घालून चांगले परतून घ्या. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नीट भाजून घ्या. आता त्यात उकडलेला भोपळा घाला आणि नीट भाजून घ्या. आता त्यात मीठ, लाल तिखट आणि काळी मिरी पावडर घाला. नंतर त्यात तीन वाट्या पाणी घालून शिजू द्या. आता गॅस बंद करा आणि ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता ते गाळून घ्या. तुम्ही हे असेच पिऊ शकता. तसेच तुम्हाला हवे असेल तर यावर काळी मिरी पावडर आणि कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करू शकता.