Tea Time Snacks: नाश्ता म्हंटल की पोहे, उपमा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाल्ले जातात. पण हे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. काही तरी वेगळं खावंसं वाटतं. नाश्त्यात काही तरी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ खावेसे वाटतं. तुम्ही विचार करत असाल की असं काही बनवू शकता जे हेल्दी आणि चविष्ट देखील असू शकते. तर यावर आम्ही उत्तर देत आहोत. तुम्ही नाष्टासाठी मसालेदार काबुली चना चाट बनवू शकता. चना चाट फक्त चवदारच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने अनेक फायदे होती. हाडे मजबूत होतील, रक्तदाब नियंत्रित होईल आणि पचनक्रिया सुधारेल. काबुली चना चाट मिनिटांत कसा बनवायचा ते जाणून घ्या.
उकडलेले चणे – १ वाटी, उकडलेले बटाटे – २, १ कांदा, २ टोमॅटो, कोथिंबीर , मिरची, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, दही, पापडी, शेव नमकीन आणि भाजलेले जिरे पावडर.
हा चाट बनवण्यासाठी प्रथम चना आणि बटाटे उकळून घ्या. आता बटाट्याची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा. आता एका मोठ्या भांड्यात चने आणि बटाटे घ्या. त्यानंतर त्यात १ कांदा, २ टोमॅटो, धणे, मिरची, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, दही, पापडी, शेव नमकीन आणि भाजलेले जिरे पूड घाला. डाळिंबाचे दाणे आणि हिरवी कोथिंबीर घालून चना चाट सजवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)