मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dussehra 2022: दसऱ्याला बनवा गुळाचा रसगुल्ला! आरोग्यदायी चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Dussehra 2022: दसऱ्याला बनवा गुळाचा रसगुल्ला! आरोग्यदायी चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 05, 2022 12:09 PM IST

Jaggery Rasgulla Recipe: साखरेच्या रसगुल्ल्यापेक्षा हा रसगुल्ला आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

गुळाचा रसगुल्ला
गुळाचा रसगुल्ला

जेव्हा रसगुल्ल्याचा विचार केला जातो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट लक्षात येते ते म्हणजे बंगाली रसगुल्ला. कोणताही सण असो किंवा आनंदाचा प्रसंग, हा बंगाली रसगुल्ला तुमचे तोंड गोड करण्यासाठी एक 'परफेक्ट स्विट' आहे. बंगाली रसगुल्ल्याचा आस्वाद तुम्ही आजपर्यंत अनेकदा चाखला असेल. पण तुम्ही कधी गुळाचा रसगुल्ला ऐकला आहे का? होय, साखरेच्या रसगुल्ल्यापेक्षा हा रसगुल्ला आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. जे खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायला पण खूप सोपे आहे. चला तर मग या दसऱ्याला जाणून घेऊया कसा बनवायचा हा चविष्ट आणि आरोग्यदायी गुळाचा रसगुल्ला.

गुळाचा रसगुल्ला बनवण्यासाठी साहित्य

१ लिटर दूध

३०० ग्रॅम गूळ

१/४ टीस्पून लिंबाचा रस

१ लिटर पाणी

२ चमचे गुलाबजल

गुळाचा रसगुल्ला बनवण्याची पद्धत

गुळाचा रसगुल्ला बनवण्यासाठी आधी दूध उकळून त्यात लिंबाचा रस घाला. दूध फुटल्यावर मलमलच्या कापडाच्या साहाय्याने गाळून घ्या. वरून थंड पाणी टाका आणि छेनाचे बंडल बांधून त्याचे पाणी काढून टाका. आता छेना बाहेर काढून हलक्या हाताने मॅश करून मध्यम आकाराचे गोळे बनवा. साखरेच्या पाकासाठी पॅनमध्ये पाणी आणि गूळ उकळवा. आचेवरून सरबत काढून गाळून घ्या. सरबत पुन्हा उच्च आचेवर ठेवा आणि उकळी आणा. त्यात छेनाचे गोळे घालून ५ मिनिटे शिजवा. नंतर झाकण ठेवून आणखी १० मिनिटे शिजवा. आता विस्तवावरून उतरवून त्यात गुलाबजल मिसळा. थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग