Mathri Recipe: तुम्हालाही गोड खायला आवडतं का? एकदा ट्राय करा गुळाची मठरी, सोपी आहे रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mathri Recipe: तुम्हालाही गोड खायला आवडतं का? एकदा ट्राय करा गुळाची मठरी, सोपी आहे रेसिपी

Mathri Recipe: तुम्हालाही गोड खायला आवडतं का? एकदा ट्राय करा गुळाची मठरी, सोपी आहे रेसिपी

Jun 26, 2024 10:32 PM IST

Mathri Recipe: तुम्हाला सुद्धा गोड खायला आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. गुळाची मठरीची ही रेसिपी खूप सोपी आहे.

गुळाची मठरी
गुळाची मठरी (freepik)

Jaggery Mathri Recipe: अनेक लोकांना जेवण झाल्यावर गोड खायला आवडते. काही लोकांना रोज जेवणासोबत काहीतरी गोड पदार्थ हवे असतात. तुम्हाला सुद्धा गोड खायला आवडत असेल आणि नेहमीचे पदार्थांऐवजी काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ही गुळाच्या मठरीची ही रेसिपी ट्राय करा. गूळ आणि गव्हाचे पीठ घालून घरी तयार केलेली ही मठरी खायला क्रिस्पी आणि बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या गुळाची मठरी कशी बनवायची.

गुळाची मठरी बनवण्यासाठी साहित्य

- मैदा - १ वाटी

- तूप - ३-४ चमचे

- गूळ - १ भेली

- खोबऱ्याचे कीस - ७-८ टीस्पून

- बडीशेप - १/२ टीस्पून

- दालचिनी पावडर - १/२ टीस्पून

- तूप - तळण्यासाठी

- मीठ - १ चिमूटभर

अशी बनवा गुळाची मठरी

गुळाची मठरी बनवण्यासाठी सर्वप्रथम गूळ पाण्यात टाकून २-३ मिनिटे वितळण्यासाठी गॅसवर ठेवा. यानंतर एका भांड्यात पीठ घेऊन त्यात बडीशेप, दालचिनी पावडर, मीठ आणि तूप घालून चांगले मिक्स करा. यानंतर त्यात वितळलेला गूळ गाळून टाळा आणि पीठ चांगले मळून घ्यावे. पीठ १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर पिठात खोबऱ्याचे कीस घालून चांगले मिक्स करा. आता पिठाचा गोळा तयार करून त्याला हव्या त्या आकारात लाटून घ्या. सर्व मठरी तयार करून प्लेटमध्ये काढून घ्या. 

आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तूप घाला. तूप चांगले गरम झाल्यावर त्यात मठरी टाका आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नीट तळून घ्या आणि प्लेटमध्ये काढून घ्या. तुमची गुळाची मठरी तयार आहे.

 

Whats_app_banner