मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  भाजी खायची इच्छा नसेल तर झटपट बनवा राजस्थानी कांजी मिरची

भाजी खायची इच्छा नसेल तर झटपट बनवा राजस्थानी कांजी मिरची

Hiral Shriram Gawande HT Marathi
Oct 05, 2022 01:36 PM IST

लंच असो वा डिनरसाठी तुम्ही नवीन आणि सुपर टेस्टी मिरची बनवू शकता. येथे आम्ही तुम्हाला राजस्थानी पद्धतीने हिरव्या मिरचीचे लोणचे कसे बनवायचे ते सांगत आहोत.

राजस्थानी कांजी मिरची
राजस्थानी कांजी मिरची

Rajasthani Kanji Mirchi Pickle Recipe : अनेक वेळा भूक तर लागते, पण भाजी खावीशी वाटत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या ताटात लोणचे किंवा चटणी यापैकी एकाचा समावेश करा. मात्र, कधी कधी नेहमीचे लोणचे, चटण्या सुद्धा खायची इच्छा नसते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जेवणात चविष्ट राजस्थानी मिरचीचे लोणचे समाविष्ट करू शकता. हे झटपट लोणचे तुमच्या जेवणाची चव दुप्पट करेल. प्रवासादरम्यान तुम्ही ते तुमच्यासोबत देखील घेऊ शकता. येथे जाणून घ्या राजस्थानी कांजी हिरव्या मिरचीच्या लोणच्याची रेसिपी

राजस्थानी कांजी हिरव्या मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य

- हिरवी मिरची

- पिवळी मोहरी

- बडीशेप

- हिंग

- लिंबू

- मीठ

 

राजस्थानी कांजी हिरवी मिरची कशी बनवायची

- हे बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा.

- पाणी गरम झाल्यावर त्यात हिरवी मिरची टाकून चांगली उकळा.

- मिरच्यांना उकळी आल्यावर हिरव्या मिरच्या बाहेर काढा. त्याचे पाणी बाजूला ठेवा.

- आता मसाला तयार करा. यासाठी पिवळी मोहरी चांगली बारीक करून पावडर बनवा.

- नंतर बडीशेपही बारीक करून घ्यावी.

- आता एका बाउलमध्ये पिवळी मोहरी पावडर, बडीशेप, मीठ आणि हिंग नीट मिक्स करा.

- हिरव्या मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी मधूनमधून कापून घ्या.

- आता त्यात मसाला भरा आणि नंतर डब्यात ठेवा.

- आता मिरचीमध्ये ठेवलेले पाणी टाका आणि नंतर त्यात लिंबाचा रस पिळून घ्या.

- हे लोणचे आंबट होण्यासाठी काही वेळ किंवा एक दिवस ठेवा आणि पुरी-पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या