Onion Pickle Recipe: दुपारचे जेवण असो वा रात्रीचे जेवण रोज तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अनेक वेळा रात्रीच्या जेवणात खिचडी, वरण-भात असे पदार्थ बनवले जातात. नेहमीचे हे साधे जेवण खायचा घरातील सर्व सदस्य कंटाळा करतात. तुमच्या घरी सुद्धा नेहमीचे जेवण करून कंटाळा आला असेल तर तुम्ही त्यासोबत कांद्याचे लोणचे बनवू शकता. हे तुमच्या जेवणाची चव आणखी वाढवेल. विशेष म्हणजे हे लोणचे अवघ्या दोन मिनिटात तयार होईल. हे इंस्टंट लोणचे खायला टेस्टी आहे आणि बनवायला खूप सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया चविष्ट कांद्याचं लोणचं कसं बनवायचं.
- ४-५ कांदा
- ८-१० हिरव्या मिरच्या
- एक चमचा कलौंजी
- आमचूर पावडर
- बडीशेप
- काश्मिरी लाल मिरची
- हळद
- चाट मसाला
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- लिंबाचा रस
- मोहरीचे तेल एक चमचा
- हिंग
- मोहरी
- मीठ
सर्वप्रथम कांद्याचे लांब जाड तुकडे करून त्यांचे तुकडे वेगळे करावेत. त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा उभी दोन भागांत कापून घ्यावी. आता या कांद्यात थोडे मसाले घाला. सर्वप्रथम अर्धा चमचा बडीशेप घाला. याचबरोबर एक चमचा काश्मिरी लाल मिरची घालून त्यात पाव चमचा हळद घाला. चाट मसाला आणि आमचूर पावडर घाला. आता चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला. कढईत तेल गरम करून त्यात हिंग घालावे. तसेच त्यात कलौंजी व मोहरी घालून फोडणी करून कांद्यावर घालावे. चांगले मिक्स करून पाच मिनिटे राहू द्या. तयार आहे तुमचे इंस्टंट कांद्याचे लोणचे. जेवणासोबत सर्व्ह करा आणि जेवणाची चव वाढवा.
संबंधित बातम्या