Instant Pickle: कैरीचं लोणचं खाण्यासाठी पाहावी लागणार नाही जास्त वाट, या रेसिपीने इंस्टंट बनवा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Instant Pickle: कैरीचं लोणचं खाण्यासाठी पाहावी लागणार नाही जास्त वाट, या रेसिपीने इंस्टंट बनवा

Instant Pickle: कैरीचं लोणचं खाण्यासाठी पाहावी लागणार नाही जास्त वाट, या रेसिपीने इंस्टंट बनवा

Jun 13, 2024 01:43 PM IST

Summer Special Recipe: साधारणपणे लोणचं बनवणे सोपे काम नाही. स्वादिष्ट लोणचे तयार होण्यास बराच वेळ लागतो. पण तुम्ही या रेसिपीने इंस्टंट कैरीचं लोणचं बनवू शकता. पाहा सोपी रेसिपी.

इंस्टंट कैरीच्या लोणच्याची रेसिपी
इंस्टंट कैरीच्या लोणच्याची रेसिपी (unsplash)

Instant Mango Pickle Recipe: कैरीचे लोणचे हे एक साइड डिश आहे जे सर्व वयोगटातील लोकांना खायला आवडते. जेवणासोबत दिले जाणारे कैरीचे लोणचे जेवणाची चव तर वाढवतेच पण माणसाची भूकही वाढवते. लोणचे टेस्टी होण्यासाठी ते काही महिने ठेवावे लागते. साधारणपणे लोणचे बनवणे सोपे काम नाही. स्वादिष्ट लोणचे तयार होण्यास बराच वेळ लागतो. पण टेस्टी लोणचे खाण्यासाठी आता तुम्हाला वाट पहायची गरज नाही. तुम्ही इंस्टंट कैरीचे लोणचे बनवून जेवणाची चव वाढवू शकता. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी आहे. चला जाणून घेऊया काय आहे इंस्टंट कैरीच्या लोणच्याची रेसिपी.

इंस्टंट कैरीचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य

- २-३ मध्यम आकाराचे कच्ची कैरी

- २ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर

- १ टीस्पून हळद

- १ टीस्पून मीठ

- १/४ टीस्पून भाजलेली मेथी पावडर

इंस्टंट कैरीच्या लोणच्याच्या तडक्यासाठी साहित्य

- ३ चमचे गिंगेली ऑइल किंवा तिळाचे तेल

- १ टीस्पून मोहरी

- १/४ टीस्पून हिंग

इंस्टंट कैरीचे लोणचे बनवण्याची पद्धत

झटपट कैरीचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम कच्च्या कैरी नीट धुवून त्याचे छोटे तुकडे करा. यानंतर कैरीच्या तुकड्यांमध्ये मीठ घालून चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा. आता एका पॅनमध्ये मेथी कोरडी भाजून बारीक वाटून घ्या. यानंतर कढईत गिंगेली ऑइल किंवा तिळाचे तेल गरम करून त्यात मोहरी टाका आणि हळू हळू फुटू द्या. गॅसची फ्लेम खूप जास्त नसावी याची विशेष काळजी घ्या. मंद ते मध्यम आचेवर ठेवा. आता त्यात हिंग, मेथी पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद घालून गॅस बंद करा आणि सर्व काही नीट मिक्स करा. 

आता हे तयार केलेला तडका लोणच्यामध्ये घालून चांगले मिक्स करा. तुमचे इंस्टंट कैरीचे लोणचे तयार आहे. जेवणासोबत सर्व्ह करा.

Whats_app_banner