मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ice Cream Recipe: घरी फ्रिज नसला तरीही बनवू शकता आईस्क्रीम, जाणून घ्या सोपी पद्धत

Ice Cream Recipe: घरी फ्रिज नसला तरीही बनवू शकता आईस्क्रीम, जाणून घ्या सोपी पद्धत

Jun 29, 2024 09:05 PM IST

Ice Cream Recipe in Marathi: आईस्क्रीम खाण्याला कोणाला आवडत नाही. पण अनेक लोकांना घरी फ्रिज नसल्यामुळे आईस्क्रीम बनवणे अवघड वाटते. पण आता काळजी करू नका फ्रिजशिवाय आईस्क्रीम बनवण्याची पद्धत जाणून घ्या.

फ्रिजशिवाय मँगो आईस्क्रीम बनवण्याची पद्धत
फ्रिजशिवाय मँगो आईस्क्रीम बनवण्याची पद्धत (unsplash)

Ice Cream Recipe Without Fridge: केवळ उन्हाळाच नाही तर काही लोक पावसाळ्यात सुद्धा आईस्क्रीम आवडीने खातात. हल्ली इंटरनेटवर आईस्क्रीम बनवण्याच्या अनेक रेसिपी उपलब्ध आहेत. आपल्याला आवडेल त्या फ्लेवरची आईस्क्रीम घरी बनवता येते. पण घरी आईस्क्रीम बनवण्यासाठी फ्रिजची गरज असते. त्याशिवाय आईस्क्रीम बनवण्याचा विचारही करता येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एक असा मार्ग सांगत आहोत जिथे तुम्हाला फ्रिजची गरज भासणार नाही आणि तुम्ही घरी भरपूर आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकाल.

फ्रीजशिवाय आंब्याची आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे या गोष्टी

फ्रिजशिवाय आईस्क्रीम बनवणं खूप सोपं आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण घरी फ्रिज तयार करू. काळजी करू नका यासाठी कुठलाही जास्त तामझाम करावा लागणार नाही. यासाठी आपल्याला फक्त दोन झिप लॉक पिशव्या, काही बर्फाचे तुकडे, अर्धा कप सैंधव मीठ लागते. तुमचा फ्रिज तयार आहे. तसं तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही आईस्क्रीम अशा प्रकारे बनवू शकता. पण इथे आम्ही तुम्हाला आंब्याच्या आईस्क्रीमची रेसिपी सांगत आहोत. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला आंबे आवश्यक आहे. यासोबतच थोडी साखर किंवा शुगर कँडी, क्रीम आणि मिल्कचीही आवश्यकता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

फ्रिजशिवाय आईस्क्रीम बनवण्याची सोपी पद्धत

फ्रिजशिवाय आईस्क्रीम बनवण्यासाठी आधी तुम्ही जे आईस्क्रीम बनवत आहात त्याची तयारी करावी लागतं. इथे मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी प्रथम त्याचे मिश्रण तयार करू. आंब्याचा गर काढून मिक्सरमध्ये घाला. आता त्यात साखर, अर्धा कप दूध आणि चवीनुसार थोडी दुधाची साय किंवा क्रीम घाला. सर्व मिक्स करून बॅटर तयार करा.

आता फ्रीजशिवाय गोठवण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत बर्फाचे तुकडे भरा. तुम्ही यासाठी दुकानातून बर्फाचे तुकडे सहज खरेदी करू शकता. आता त्यात अर्धा कप सैंधव मीठ घाला. आईस्क्रीम मिश्रण दुसऱ्या प्लास्टिक पिशवीत टाका. ही मिक्सर बॅग बर्फाच्या पिशवीत बर्फाच्या मध्यभागी ठेवा. संपूर्ण मिश्रणाची बॅग वरून बर्फाने झाकून ठेवा. आता याला टॉवेलने झाकून पाच मिनिटे हाताने ढवळत राहा. अवघ्या पाच मिनिटांत तुम्हाला दिसेल की तुमचे आईस्क्रीम पूर्णपणे तयार आहे.

WhatsApp channel