मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hot Chocolate: हिवाळ्यासाठी बेस्ट आहे हॉट चॉकलेट, या रेसिपीने घरीच तयार करा

Hot Chocolate: हिवाळ्यासाठी बेस्ट आहे हॉट चॉकलेट, या रेसिपीने घरीच तयार करा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 05, 2024 07:44 PM IST

Winter Special Recipe: हिवाळ्यात गरम पदार्थ आणि पेय घ्यायला कोणाला आवडत नाही. नेहमीच्या चहा- कॉफी ऐवजी दुसरं काही घ्यायचं असेल तर हॉट चॉकलेट बनवा.

हॉट चॉकलेट
हॉट चॉकलेट (unsplash)

Hot Chocolate Recipe: थंडीच्या दिवसात गरम पेय पिण्याची वेगळीच मजा असते. या काळात लोकांना चहा-कॉफी प्यायला आवडते. नेहमीच्या चहा कॉफीसोबतच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावेळी काहीतरी वेगळं करून पाहू शकता. हिवाळ्यातील तुमची गोड खाण्याची क्रेविंग दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हॉट चॉकलेट बनवू शकता. चला जाणून घेऊया घरच्या घरी हॉट चॉकलेट कसे बनवायचे.

हॉट चॉकलेट बनवण्यासाठी साहित्य

- दीड कप ब्राऊन शुगर

- १ ग्लास दूध

- डार्क चॉकलेट बारीक चिरलेली

- १ चिमूटभर दालचिनी

- १ टेबलस्पून व्हिपिंग क्रीम

हॉट चॉकलेट बनवण्याची पद्धत

घरी हॉट चॉकलेट बनवण्यासाठी एका सॉस पॅनमध्ये दूध तीन ते चार मिनिटे मध्यम आचेवर गरम करा. नंतर त्यात ब्राऊन शुगर टाका आणि विरघळेपर्यंत मिक्स करा. आता डार्क चॉकलेट टाका आणि ते पूर्णपणे वितळेपर्यंत सॉस पॅनमध्ये ढवळत राहा. यासाठी सुमारे दोन ते तीन मिनिटे लागतील. आता गॅसवरून सॉस पॅन बाजूला काढा. नंतर त्यात क्रीम आणि दालचिनी टाकून मिक्स करा. तुमचे हॉट चॉकलेट तयार आहे. टॉपिंगसाठी व्हीप्ड क्रीम वापरा. तुम्हाला नको असेल तर स्किप करु शकता. गरमा गरम हॉट चॉकलेटची मजा घ्या.

WhatsApp channel

विभाग