How To Make Honey Butter Toast: सकाळ सहसा खूप फास्ट काम करावी लागतात. सकाळी फार कमी वेळात अनेक काम करायची असतात. अशावेळी नाश्त्यात काय बनवावं हे समजत नाही. व्यस्त असते. आपण सतत झटपट, साधे आणि स्वादिष्ट पदार्थांच्या शोधात असतो. नुकतीच आम्हाला अशीच एक रेसिपी सापडली आहे. ही रेसिपी टेस्टी आणि बनवायला जास्त वेळ घेणारी नाही. ही रेसिपी आहे हनी बटर टोस्ट. ही अनोखी रेसिपी शेफ कीर्ती भौतिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. चला ही रेसिपी जाणून घेऊयात.
सर्व प्रथम, ब्रेडचा तुकडा घ्या आणि कडा कापून घ्या. नंतर बटर, ब्राऊन शुगर आणि मध वापरून मिश्रण तयार करा आणि ते सर्व ब्रेडवर पसरवा. तव्यावर टोस्ट करा आणि आनंद घ्या.
या डिशसाठी तुम्हाला फक्त चॉकलेट-हेझलनट स्प्रेड ब्रेडच्या दोन स्लाइसमध्ये पसरवायचे आहे. त्याआधी स्लाइसच्या कडा कट करायला विसरू नकात. त्यानंतर, त्यावर बटर, ब्राऊन आणि मध घालून झाकून ठेवा. दोन्ही स्लाइस सँडविच सारखे एकमेंकांवर ठेवा. सँडविच कुरकुरीत आणि तपकिरी होईपर्यंत सर्व बाजूंनी पूर्णपणे टोस्ट करा. सँडविच मधोमध कापून फ्रेश क्रीम आणि फळांसोबत सर्व्ह करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)