Trick To Make Soda at Home: थंडगार सोडा ड्रिंक्स पिण्याची मजा वेगळीच असते. कैरीचे पन्हं असो की शिकंजी किंवा सरबत, किंवा कोणतेही मॉकटेल असो, सोडा नसेल तर या सर्वांची चव फारशी कोणाला आवडणार नाही. पण जर तुम्ही बाजारातील सोडा पिण्याकडे दुर्लक्ष केले कारण ते हानिकारक आहे. तर यावेळी नैसर्गिक गोष्टींपासून सोडा तयार करता येईल. घरच्या घरी आल्याच्या मदतीने तुम्ही सोडा ड्रिंक बनवू शकता. हे बनवायला फार मेहनत लागत नाही. चला तर मग जाणून घ्या नैसर्गिक घरगुती सोडा ड्रिंक कसे बनवायचे.
- एक चमचा किसलेले आले
- एक चमचा गूळ किंवा साखर
- एक कप गरम पाणी
घरच्या घरी सोडा तयार करण्यासाठी आपल्याला ५-६ दिवस लागू शकतात. होममेड सोडा बनवण्यासाठी एक रुंद तोंडाचे काचेचे जार धुवा आणि ती चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. आता आलं नीट धुवून किसून घ्या. नंतर या काचेच्या जारमध्ये एक चमचा साखर किंवा गुळ बारीक पावडर बनवून घाला. आता त्यात किसलेले आले घाला आणि एक कप कोमट पाणी घाला. आता एखाद्या कापडाने कापडाचे तोंड बांधून ते एखाद्या उबदार जागी ठेवा. उन्हात ठेवू नये याची काळजी घ्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा जारचे तोंड उघडून आल्याबरोबर गूळ किंवा साखरेचे प्रमाण मिक्स करा. पुढील पाच ते सहा दिवस गुळ किंवा साखरेसोब ठराविक प्रमाणात आले त्यात मिक्स करावे. जोपर्यंत ते चांगले फर्मेंट होत नाही.
आता हे उघडा, गाळून घ्या आणि स्वच्छ काचेच्या जारमध्ये ठेवा. तयार आहे तुमची होममेड नॅचरल आल्यापासून तयार केलेले सोडा ड्रिंक. हे कोणत्याही फळांच्या ज्यूसमध्ये मिक्स करून थंडगार सर्व्ह करा.
संबंधित बातम्या