Homemade Natural Moisturizer with Honey: हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे त्वचा जास्त कोरडी होते. थंडी वाढयला लागली की त्वचा अधिक निर्जीव आणि रफ दिसायला लागते. त्वचा जास्त कोरडी झाल्यामुळे ते खूप वाईट दिसते. विशेषत: कोपर आणि गुडघ्यासारख्या कठीण ठिकाणांची त्वचा पूर्णपणे रफ आणि खराब होते. हिवाळ्याच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारातील मॉइश्चरायझरऐवजी घर बनवलेले नॅचरल मॉइश्चरायझर लावू शकता. हे बनवणे सोपे आहे शिवाय ते त्वचेसाठी खूप प्रभावी आहे. जाणून घ्या हे कसे बनवायचे.
होममेड मॉइश्चरायझर त्वचेवर जलद प्रभाव दाखवते. जर तुम्ही ते रोज लावले तर संपूर्ण हिवाळ्यात त्वचेच्या कोरडेपणापासून तुमचे संरक्षण होईल. जाणून घ्या ते कसे बनवायचे
- एक चमचा मध
- दोन चमचे ग्लिसरीन
- दोन चमचे गुलाब जल
या तीन गोष्टी मिक्स करून एका बॉटलमध्ये भरा. लक्षात ठेवा की मध सेंद्रिय असावा आणि यात भेसळ नसावी. जेणेकरून मधाचे संपूर्ण फायदे मिळू शकतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर हे मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होईल.
रोज मध चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे होतात. हे त्वचेला आतून मॉइश्चराइझ करते. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार दिसू लागते. याशिवाय ते त्वचेला रिंकल फ्री बनवण्यास आणि नैसर्गिकरित्या ब्लीचिंग करण्यास मदत करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)