मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Popsicle Recipe: मुलांना द्या रंगीबेरंगी आईस्क्रीमची ट्रीट, सर्वांना आवडेल चव, पाहा रेसिपी

Popsicle Recipe: मुलांना द्या रंगीबेरंगी आईस्क्रीमची ट्रीट, सर्वांना आवडेल चव, पाहा रेसिपी

Jun 14, 2024 08:12 PM IST

Summer Special Recipe: लहान मुलांना आईस्क्रीम, कुल्फी खायला खूप आवडते. तुम्ही घरी आईस्क्रीम बनवण्याचा विचार करत असाल तर यावेळी फ्रूट पॉप्सिकल ट्राय करा. जाणून घ्या रेसिपी.

फ्रूट पॉप्सिकलची रेसिपी
फ्रूट पॉप्सिकलची रेसिपी

Fruit Popsicle Recipe: उन्हाळ्यात मुले नेहमी थंड आणि टेस्टी पदार्थांची मागणी करतात. हेल्दी फळे खायचं म्हटलं तर मुलं कंटाळा करतात. पण त्याऐवजी फळांचे आईस्क्रीम सर्व जण आवडीने खातात. पण प्रत्येक वेळी बाजारातील किंवा क्रीमची आईस्क्रीम मुलांना खायला द्यायचे नाही. त्यामुळे तुम्ही हेल्दी फळांपासून तयार केलेले पॉप्सिकल्स घरीच बनवा. ही रंगीबेरंगी थंड आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मुले नक्कीच खूश होतील. चला तर मग जाणून घेऊया ३ प्रकारचे पॉप्सिकल्स बनवण्याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

टरबूज पॉप्सिकल

हे बनवण्यासाठी साहित्य

- टरबूजाचे तुकडे १ कप

- साखर चवीनुसार

- लिंबाचा रस ३ चमचे

कृती

टरबूजातील बिया काढून त्याचे तुकडे करा. ब्लेंडरमध्ये टरबूजचे तुकडे आणि साखर घालून बारीक करा. मिश्रण घट्ट असावे आणि त्यात गुठळ्या नसाव्यात. आवश्यक असल्यास रस गाळून घ्या. आता रसात लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार मिश्रण पॉप्सिकल मोल्डमध्ये घाला आणि फ्रीजरमध्ये गोठण्यासाठी ठेवा. यासाठी सहा ते सात तास लागतील. साच्यातून पॉप्सिकल काढा आणि सर्व्ह करा.

जांभूळ पॉप्सिकल

हे बनवण्यासाठी साहित्य

- जामुन १\२ कप

- साखर १ चमचे

- चाट मसाला १ चमचा

- काळे मीठ १\४ चमचे

- मीठ १\४ चमचे

- लिंबाचा रस २ चमचे

- पाणी १ कप

कृती

जांभूळ नीट धुवून बिया काढून घ्या. जांभूळ, साखर, चाट मसाला, काळे मीठ, मीठ आणि लिंबाचा रस ब्लेंडरमध्ये घालून चांगले बारीक करा. पाणी घालून पुन्हा एकदा ब्लेंडरमध्ये ब्लेंड करा. आता तयार केलेले साहित्य कुल्फीच्या साच्यात टाका आणि ॲल्युमिनियम फॉइलने झाकून ठेवा. चाकूच्या मदतीने फॉइलमध्ये एक लहान छिद्र करा आणि त्या छिद्रातून आईस्क्रीमची काडी साच्यात घाला. कुल्फी आठ तास फ्रीझरमध्ये ठेवा आणि नंतर साच्यातून काढून सर्व्ह करा.

मँगो पॉप्सिकल

साहित्य

- पिकलेले आंबे २

- साखर ४ चमचे

- पाणी १ कप

कृती

आंबा नीट धुवून त्याचे साल काढून घ्या. आंब्याचे तुकडे करुन मिक्सरच्या जारमध्ये टाका. त्यात साखर टाकून चांगले ब्लेंड करून घ्या. थोडे पाणी घालून आणखी ब्लेंड करून घ्या. आता हे मिश्रण पॉप्सिकल मोल्डमध्ये घाला आणि फ्रीजरमध्ये फ्रीज होण्यासाठी ठेवा. साधारण सहा ते सात तासात पॉप्सिकल तयार होतील. पॉप्सिकल साच्यातून काढा आणि सर्व्ह करा.

WhatsApp channel
विभाग