Beetroot Lip Balm: गुलाबासारखे मऊ आणि गुलाबी ओठ हवेत? घरीच बनवा बीटरूट लिप बाम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beetroot Lip Balm: गुलाबासारखे मऊ आणि गुलाबी ओठ हवेत? घरीच बनवा बीटरूट लिप बाम

Beetroot Lip Balm: गुलाबासारखे मऊ आणि गुलाबी ओठ हवेत? घरीच बनवा बीटरूट लिप बाम

Jan 31, 2024 10:59 PM IST

Skin Care: हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात. यासाठी तुम्ही घरगुती बीटरूट लिप बाम बनवून वापरू शकता.

How to make homemade beetroot lip balm
How to make homemade beetroot lip balm (freepik)

Beauty Tips: कॉलेजला जाणं असो वा ऑफिस अगदी रोजच महिला लिपस्टिक किंवा लिपग्लॉस वापरता. एका लिपस्टिकने चेहऱ्याचं सौंदर्य वाढते. यासाठी ओठ छान असणे गरजेचे आहे. हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात. अनेकांना हिवाळ्यात ओठ फुटण्याच्या समस्येने त्रास आहेत. बाजारात यावर अनेक प्रकारचे उत्पादने उपलब्ध आहेत. यामुळे ओठ मऊ आणि ग्लॉसी होऊ शकतात, परंतु या उत्पादनांचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. अनेक वेळा अशी उत्पादने वापरल्यामुळे ओठ काळे होतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच लिपबाम बनवू शकता. बीटरूटपासून तुम्ही नैसर्गिक DIY लिप बाम बनवू शकता. बीटरूट ओठांचा रंगही सुधारतो. हा लिप बाम लावल्याने ओठ गुलाबी आणि मुलायम होतात.

काय साहित्य लागेल?

बीटरूटपासून लिप बाम बनवण्यासाठी तुम्हाला चार गोष्टींची गरज असेल. खोबरेल तेल, व्हॅसलीन, व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल आणि बीटरूट या तीन गोष्टी लागतील. या तिन्ही गोष्टी ओठांसाठी फायदेशीर आहेत. तिन्हींचे मिश्रण बनवून लावल्याने ओठ अधिक सुंदर होतात. डेड स्किन, ओठांची त्वचा काळी पडणे, तडे जाणे इत्यादी समस्या याने कमी होतात. बीटरूटपासून बनवलेला लिप बाम या सर्व समस्या दूर करतो.

Lip Care: हिवाळ्यात ओठ फाटले आहेत? अशाप्रकारे घ्या ओठांची काळजी!

बीटरूट लिप बाम कसा बनवायचा?

> सर्वप्रथम एका भांड्यात ३ चमचे बीटरूटचा रस काढा.

> आता त्यात १ चमचा व्हॅसलीन वितळवून मिक्स करा.

> व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल कापून त्यात घाला.

> तुम्ही त्यात थोडे खोबरेल तेलही मिसळा.

> या सर्व गोष्टी नीट मिसळा आणि बाजूला ठेवा.

> ते एका कंटेनरमध्ये किंवा व्हॅसलीनच्या लहान बॉक्समध्ये ठेवा.

> आता मिश्रण रेफ्रिजरेटरमध्ये १-२ तास थंड होऊ द्या.

> बीटरूटपासून बनवलेला DIY लिप बाम तयार आहे ज्यामुळे तुमचे ओठ पूर्णपणे गुलाबी होतील.

Coconut Oil: खोबरेल तेलात या २ गोष्टी मिसळून वापरा, केस आणि त्वचेला मिळतील अनेक फायदे!

हा लिप बाम तुम्ही बराच वेळेसाठी स्टोअर करून ठेवू शकता. हे लावल्यानंतर ओठ गुलाबी दिसतील. यामुळे तुमच्या फाटलेल्या ओठांची समस्याही दूर होईल. जेव्हा जेव्हा तुमचे ओठ कोरडे वाटू लागतील तेव्हा हा लिप बाम लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner