Hing Kachori Recipe: संध्याकाळी चहासोबत काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. अशा परिस्थितीत तुम्ही संध्याकाळी स्नॅक्समध्ये कचोरी बनवू शकता. कचोरी चवीला टेस्टी तर लागतेच पण ती संध्याकाळची भूक देखील भागवते. खरं तर कचोरी अनेक गोष्टींपासून तयार केली जाते, पण यावेळी तुम्ही हिंग कचोरी ट्राय करा. याची चव अप्रतिम आहे आणि तुम्ही ती तिखट चटणीसोबत सर्व्ह करू शकता. ही रेसिपी बनवायला सोपी आहे. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची हिंग कचोरी
- १ कप उडीद डाळ (रात्रभर भिजवलेली)
- २ इंच आले
- २ हिरव्या मिरच्या
- १/४ टीस्पून कलौंजी किंवा काळे जिरे
- १ टीस्पून बडीशेप पावडर
- १-१.५ टीस्पून हिंग पावडर
- १ टीस्पून साखर
- १ चमचा तेल
- चवीनुसार मीठ
पीठ साठी
- ३५० ग्रॅम मैदा
- कोमट पाणी
- मोईनसाठी तेल
- अर्धा टीस्पून मीठ
- १ टेबलस्पून बारीक केलेली साखर
कचोरी बनवण्यासाठी प्रथम पीठ तयार करा. यासाठी सर्व गोष्टी एकत्र करा. नंतर गरजेनुसार पाणी घेऊन पीठ मळून घ्या. हे पीठ फार घट्ट किंवा मऊ नको. आता हे झाकून बाजूला ठेवा. डाळ तयार करण्यासाठी भिजवलेली उडीद डाळ बारीक करा आणि नंतर थोडे पाणी घाला जेणेकरून ते दळणे सोपे होईल. आता आलं, मिरची आणि चिमूटभर मीठ घालून पेस्ट बनवा. तसेच कलौंजी बारीक करून त्याची पावडर बनवा. कढईत तेल गरम करून त्यात कलौंजी आणि हिंग टाका. नंतर आले मिरची पेस्ट घालून ३० सेकंद परतून घ्या. बारीक केलेली डाळ आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. नंतर काही वेळाने बडीशेप पावडर, साखर घालून मिक्स करा. ते चांगले मिसळा. जेव्हा पाणी हळूहळू सुकते आणि गुठळ्या तयार होऊ लागतात आणि डाळ चिकटू लागते तेव्हा समजून घ्या की हिंग कचोरीचे सारण तयार आहे. हे एका प्लेटमध्ये ठेवा, पसरवा आणि थंड होऊ द्या.
कचोरी तळण्यासाठी पुरेसे तेल गरम करा. नंतर मळलेल्या पीठाचा थोडासा भाग घ्या आणि बोटांनी दाबून एक वाडगा तयार करा. त्यात पुरेशा प्रमाणात सारण ठेवा आणि कडा एकत्र आणून पुन्हा गोल करा. थोडं तेल लावून, लाटण्याने लाटून घ्या. आता हे गरम तेलात तळून घ्या. तळल्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवा. सर्व कचोऱ्या त्याच पद्धतीने तयार करा आणि गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या