Cutlet Recipe: संध्याकाळच्या चहासोबत टेस्टी लागतात क्विनोआ कटलेट, बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cutlet Recipe: संध्याकाळच्या चहासोबत टेस्टी लागतात क्विनोआ कटलेट, बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी

Cutlet Recipe: संध्याकाळच्या चहासोबत टेस्टी लागतात क्विनोआ कटलेट, बनवण्यासाठी पाहा ही रेसिपी

Jul 25, 2024 06:34 PM IST

Healthy Snacks Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही हेल्दी रेसिपी शोधत असाल तर तुम्ही क्विनोआ कटलेट बनवू शकता. हे बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

क्विनोआ कटलेट
क्विनोआ कटलेट (freepik)

Quinoa Cutlet Recipe: लोक अनेकदा संध्याकाळी भूक लागल्यावर चहासोबत काही स्नॅक्स खातात. पण अनेक वेळा हे अनहेल्दी स्नॅक्स आपले संपूर्ण डायटिंग शेड्युल बिघडवतात. तसेच तुमचे आरोग्य देखील खराब होऊ शकते. संध्याकाळच्या चहासोबत काही हेल्दी स्नॅक्स खाण्याचा विचार करत असाल तर क्विनोआ कटलेट बनवून खा. त्याची चव खूप टेस्टी आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य आहे. हे कटलेट बनवायला देखील सोपे आहेत. विशेष म्हणजे ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल.  चला तर मग जाणून घेऊया हेल्दी स्नॅक्स क्विनोआ कटलेट कसे बनवायचे.

 

क्विनोआ कटलेट बनवण्यासाठी साहित्य

- १/२ कप क्विनोआ

- १ कप पाणी

- १५० ग्रॅम पनीर

- २ चमचे बेसन

- १ वाटी चिरलेला पालक

- २ चमचे लिंबाचा रस

- बारीक चिरलेली हिरवी मिरची

- एक चमचा काश्मिरी लाल तिखट

- धने पूड

- पांढरी मिरची पावडर

- चवीनुसार मीठ

किनोआ कटलेट बनवण्याची पद्धत

हे हेल्दी स्नॅक्स बनवण्यासाठी प्रथम क्विनोआ चांगले धुवून घ्या. मग हे कुकरमध्ये पाण्यात टाका आणि शिट्टी लावा. किनोआ एका शिट्टीत शिजेल. मग गॅस बंद करा आणि शिट्टी उघडण्याची वाट पहा. आता एक बाऊल घ्या. त्यात बारीक चिरलेला पालक घाला. पालक आधी धुवून चिरून घ्या. त्यात पनीर मॅश करून टाका आणि एकत्र मिक्स करा. आता त्यात चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेले आले घाला. त्यात काश्मिरी लाल तिखट, धणे पूड आणि पांढरी मिरची घालून हाताने मिक्स करा. प्रेशर कुकरमधून क्विनोआ काढून तयार पनीर आणि पालकाच्या मिश्रणात घाला. हे सर्व मिश्रण हातांच्या साहाय्याने एकत्र मिक्स करा आणि बांधा. गरज पडल्यास हातात थोडं तेल लावून मिश्रणाला कटलेटचा आकार द्यावा. 

आता एका कढईवर किंवा पॅनमध्ये देशी तूप घालून त्यात हे कटलेट मंद आणि हाय फ्लेमवर भाजून घ्या. तुमचे टेस्टी लो फॅट क्विनोआ कटलेट तयार करा. हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Whats_app_banner