मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Moong Dal Cheela: नाश्त्यासाठी बनवा झटपट व्हिटॅमिन युक्त मूग डाळ चीला, जाणून घ्या रेसिपी!

Moong Dal Cheela: नाश्त्यासाठी बनवा झटपट व्हिटॅमिन युक्त मूग डाळ चीला, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 19, 2024 08:45 AM IST

Breakfast Recipe: मूग डाळ चीला सकाळच्या घाईत झटपट तयार करू शकता. हा एक हेल्दी नाश्त्याचा पर्याय आहे.

how to make Moong Dal Cheela
how to make Moong Dal Cheela (freepik)

Winter Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता हेल्दी असावा असं सगळ्यांनाच वाटतं. नाश्ता हेल्दी तर असावाच त्यासोबतच चविष्ट असणे देखील गरजेचे आहे. सकाळच्या वेळी झटपट तयार होणारे नाश्त्याचे पदार्थांच्या रेसिपी शोधल्या जातात. अशावेळी मूग डाळ चीला हा एक चांगला पर्याय असू शकतो. बेसनाचा चीला तुम्ही अनेकदा खाल्ला असेल पण आज आम्ही तुम्हाला मूग डाळ चीला (Moong Dal Cheela Recipe) बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. मूग डाळीमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबर आढळतात जे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. हा चीला खाल्ल्यानंतर तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. हा नाश्ता तुम्हाला वजन कमी होण्यास मदत होते. मूग डाळ चीला तुम्ही झटपट बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात रेसिपी...

लागणारे साहित्य

२०० ग्रॅम मूग डाळ, पनीर ४-५ तुकडे, १ टीस्पून चाट मसाला, १ टीस्पून बारीक तुकडे, १/२ टीस्पून कांदा, गाजराचे तुकडे, चवीनुसार मीठ

जाणून घ्या कृती

ज्या दिवशी चीला बनवायचा आहे त्याच्या आदल्या रात्री मूग डाळ भिजत ठेवा. सकाळी मूग डाळ बारीक करून त्यात हलके मीठ टाकून त्याची बारीक पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये गाजर, सिमला मिरची आणि पनीरचे तुकडे ठेचून चांगले मिसळा. आता या पेस्टमध्ये १ चमचा चाट मसाला घाला. हे मिश्रण अर्धा तास रेस्ट करण्यासाठी असेच ठेवा. आता यानंतर, पॅन गरम करा आणि मिश्रण पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्या.आता मिश्रण तव्यावर गोल आकारात पसरून घ्या. बाजूने थोडं तूप घाला, उलटा करा आणि दुसऱ्या बाजूने हलके शिजू द्या. आता या चीला गोड आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

WhatsApp channel