Healthy Bean Salad Recipe For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी लोक सगळ्यात आधी खाणे-पिणे बंद करतात. पण, अशा प्रकारे वजन कमी केल्यास पुन्हा वजन वाढू शकते. त्यामुळे निरोगी पद्धतीने वजन कमी करणं गरजेचं आहे. हेल्दी पद्धतीने वजन कमी केल्यास ते टिकवून ठेवणेही सोपे जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे, ते आपल्या आहारात सॅलड खाऊ शकतात. हा एक निरोगी आहाराचा पर्याय आहे, जो आपल्याला वजन कमी करण्यास आणि ते नियंत्रित राखण्यास मदत करेल. हे टेस्टी बीन सॅलड अतिशय आरोग्यदायी गोष्टींनी बनलेले असते, जे तुमच्या घरात सहज उपलब्ध असतील. या सॅलडमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. पाहा, वजन कमी करणारे ‘हे’ सॅलड कसे बनवायचे, जाणून घ्या...
उकडलेले पांढरे चणे,
उकडलेले काळे चणे,
उकडलेले राजमा,
ऑलिव्ह ऑईल,
शिमला मिरची,
कांदा,
टोमॅटो,
लसूण,
लिंबाचा रस,
मीठ,
काळी मिरी,
जिरे पूड,
धणे पूड,
चाट मसाला,
हिरव्या मिरच्या,
व्हिनेगर,
कोथिंबीर
वजन कमी करणारे बीन सॅलड बनवण्यासाठी सर्वप्रथम पांढरे चणा, काळे चणे आणि लाल राजमा रात्रभर भिजत ठेवा. ही कडधान्ये भिजत घालण्यापूर्वी हातांनी चोळून स्वच्छ करून घ्या. यानंतर कमीतकमी १० ते १२ तास भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही स्वच्छ पाण्यात उकळून घ्या. ही कडधान्ये नीट उकडून घ्या. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण बारीक चिरून घ्या. एका भांड्यात कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, लसूण घालून, त्यात उकडलेले चणे, काळे चणे आणि राजमा मिक्स करा. नंतर त्यात लिंबाचा रस, मीठ, मिरपूड, चाट मसाला, जिरे पूड, कोथिंबीर पावडर, ऑलिव्ह ऑईल, व्हिनेगर, बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. सर्व काही नीट मिक्स करा. कोथिंबिरीच्या पानांनी सजवा आणि नंतर सर्व्ह करा.
हाय प्रोटीन आणि फायबर्स: पांढरे चणे, काळे चणे आणि राजमा यामध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन आणि फायबर्स असतात, जे शरीरात स्नायूंचं पुनर्निर्माण करतात आणि दीर्घकाळ भुकेची भावना कमी करतात.
कॅलरी कंट्रोल: या सॅलडमध्ये कमी कॅलरी आणि अधिक पोषणतत्त्वे असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येतं.
हृदयासाठी फायदेशीर: ऑलिव्ह ऑईल आणि भाज्यांमधून मिळणारे निरोगी फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पचनासाठी मदत: फायबर्स आणि भाज्यांचे संयोजन पचन क्रियेला उत्तेजन देते आणि जड पदार्थांची समस्या दूर करतो.
संबंधित बातम्या