मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Banana Bread Recipe: लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा प्रोटीनयुक्त केळी ब्रेड, जाणून घ्या रेसिपी!

Banana Bread Recipe: लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा प्रोटीनयुक्त केळी ब्रेड, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 19, 2024 09:31 AM IST

Breakfast Recipe: मुलांसाठी पौष्टिकतेने परिपूर्ण असा नाश्ता हवा असेल तर केळीचा ब्रेड हा एक उत्तम पर्याय आहे.

how to make healthy banana bread
how to make healthy banana bread (Unsplash)

Healthy Breakfast Recipe: मुलांसाठी सकाळचा नाश्ता करवणे खूप अवघड काम आहे. मुलं सकाळी फार खाण्यासाठी फार नाटक करतात. याशिवाय मुलांना रोज नवनवीन पदार्थ हवे असतात. त्यांच्या रोज वेगवेगळ्या डिमांड असतात. अशा परिस्थितीत, चवदार आणि आरोग्यदायी पदार्थांचा विचार करणे मोठा टास्क असतो. याचमुळे आम्ही तुम्हाला अशाच एका डिशबद्दल सांगणार आहोत, जी तुमच्या मुलांना आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप आवडेल. ही डिश टेस्टी तर आहेच याशिवाय ही डिश आरोग्यासाठीही उत्तम आहे. केळी ब्रेड असे या डिशचे नाव आहे. ही प्रथिनेयुक्त डिश मुलांचे आरोग्य तर राखतेच शिवाय त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासालाही चालना मिळते. चला हा ब्रेड बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.

जाणून घ्या साहित्य

पिकलेली केळी - ४

अंडी - २

दही- अर्धा कप

मध किंवा गूळ - अर्धा कप

व्हॅनिला एसेन्स - १ टीस्पून

दूध - १/४ कप

तेल किंवा बटर - अर्धा कप

बदाम पावडर - दीड कप

प्रथिने पावडर - अर्धा कप

बेकिंग पावडर - एक टीस्पून

बेकिंग सोडा - अर्धा टीस्पून

बारीक चिरलेली ड्रायफ्रूट्स

चोको चिप्स

चवीनुसार मीठ

Holi 2024: चविष्ट आणि कुरकुरीत 'साबुदाणा पापड' घरीच बनवा, जाणून घ्या सोपी रेसिपी!

जाणून घ्या कृती

> केळीचा ब्रेड बनवण्यासाठी प्रथम पिकलेले केळे एका भांड्यात मॅशरच्या मदतीने चांगले मॅश करा. त्यात एकही गुठळी शिल्लक राहू नये हे लक्षात ठेवा.

> ओव्हन १७५°C पर्यंत गरम करा आणि लोफ पॅनला तेल किंवा बटरने ग्रीस करा. आता दुसऱ्या भांड्यात अंडी, दही आणि गूळ फेटून घ्या.

> यानंतर मॅश केलेल्या केळ्यामध्ये बदाम पावडर, प्रोटीन पावडर, व्हॅनिला इसेन्स, काही चिरलेले ड्रायफ्रुट्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, थोडे बटर आणि मीठ घाला.

Kabab Recipe: ही कबाब रेसिपी आहे आरोग्यदायी, आवर्जून बनवा नाश्त्यासाठी!

> यानंतर, प्री-व्हीप्ड दूध आणि अंड्याचे मिश्रण घाला आणि सर्व साहित्य चांगले मिसळा.

> सर्व काही नीट मिक्स झाले की ग्रीस केलेल्या लोफ पॅनमध्ये ठेवा, वरून चोको चिप्स आणि ड्रायफ्रूट्स घाला आणि बेक करण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवा.

४०-५- मिनिटे बेक होण्यासाठी वेळ लागेल.

> टूथपिकने ब्रेड चेक करून घ्या. जर टूथपिक स्वच्छ बाहेर आले तर याचा अर्थ तुमची केळी ब्रेड तयार आहे.

> या ब्रेडचे तुकडे करा आणि जाम किंवा बटर बरोबर सर्व्ह करा.

WhatsApp channel