Hariyali Chicken Makhani Recipe: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोक पार्टी आयोजित करतात. तुमच्या घरी सुद्धा तुम्ही पार्टी आयोजित केली असेल आणि तुमच्या नॉन व्हेज प्रेमी मित्रांसाठी काही वेगळी रेसिपी शोधत असाल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. हरियाली चिकन मखनीची ही रेसिपी बनवायला सोपी तर आहेच शिवाय खायलाही टेस्टी आहे. तुम्ही भात, रोटी आणि नानसोबत हरियाली चिकन मखनी सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची टेस्टी हरियाली चिकन मखनीची रेसिपी
- ५०० ग्रॅम चिकन
- १/२ कप कांद्याची पेस्ट
- १ कप पालक प्युरी
- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- १ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
- १ टीस्पून पुदीना पेस्ट
- १ टीस्पून कोथिंबीर पेस्ट
- १ टीस्पून लिंबाचा रस
- १/४ कप दही
- ३ चमचे फ्रेश क्रीम
- २ चमचे बटर
- १/४ टीस्पून काळी मिरी
- १/४ टीस्पून कसुरी मेथी
- १/२ टीस्पून चाट मसाला
- १ टीस्पून वेलची पावडर
- १/४ टीस्पून हळद
- १ टीस्पून धने पावडर
- दीड टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून तेल
- १/२ टीस्पून जिरे
- १ टीस्पून मोहरीचे तेल
- चवीनुसार मीठ
हरियाली चिकन मखनी बनवण्यासाठी प्रथम चिकनचे तुकडे नीट स्वच्छ धुवा आणि मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा. नंतर मीठ, आले-लसूण पेस्ट, जिरे पूड, चाट मसाला, काळी मिरी पावडर, हिरव्या मिरचीची पेस्ट, पुदिना पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट, पालक प्युरी, हंग्ड कर्ड, कसुरी मेथी पावडर, लिंबू, रस आणि मोहरीचे तेल घालून मिक्स करा. हे सर्व चांगले मिक्स करा आणि ४५ मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवा. यानंतर एका कढईत तेल आणि बटर गरम करून त्यात कांद्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्या. आता आले आणि लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट घालून काही सेकंद परतावे. त्यात उरलेला पुदिना आणि कोथिंबीर पेस्ट घालून मिक्स करा. नंतर त्यात वेलची पावडर आणि हळद घालून १-२ मिनिटे शिजवा. मसाल्यातून तेल सुटू लागले की त्यात पालक प्युरी घालून ३-४ मिनिटे शिजवून घ्या. नंतर मीठ आणि फ्रेश क्रीम घालून मिक्स करा. आता यात १ चमचा धणे पावडर आणि गरम मसाला घालून सुमारे ५-७ मिनिटे शिजवा.
शेवटी मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि किमान २० ते २५ मिनिटे शिजवा. त्यात गरजेनुसार पाणीही घालू शकता. शेवटी त्यात थोडी फ्रेश क्रीम टाका, मिक्स करून गॅस बंद करा. तुमचे टेस्टी हरियाली चिकन मखनी तयार आहे.
संबंधित बातम्या