मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kabab Recipe: ही कबाब रेसिपी आहे आरोग्यदायी, आवर्जून बनवा नाश्त्यासाठी!

Kabab Recipe: ही कबाब रेसिपी आहे आरोग्यदायी, आवर्जून बनवा नाश्त्यासाठी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Mar 14, 2024 08:55 AM IST

Ramadan Sehri Recipe: सेहरीसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे कबाब तयार करून खाऊ शकता जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊयात रेसिपी.

how to make Hara bhara kabab
how to make Hara bhara kabab (Freepik)

Hara bhara kabab recipe: रमजानचा महिना सुरू असून यावेळी वेगवगेळे पदार्थ बनवले जातात. या काळात आवर्जून ऊर्जा देणारे पदार्थ (lifestyle news in marathi) खावेत. कारण उपवासाच्या वेळी शरीराला भरपूर ऊर्जा लागते. सेहरीच्या वेळी सकाळी काहीतरी असे पदार्थ खावेत जे लवकर पचू शकतात. तसेच असे पदार्थ दिवसभर खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होऊ नये. तुमचा उपवास नसला आणि तरी तुम्ही नाश्त्यासाठी काही हेल्दी पर्याय शोधात असला तर तुम्ही हे कबाब नक्की ट्राय करू शकता. हे हेल्दी कबाब म्हणजे हरा भरा कबाब. हे व्हेज कबाब आहे आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहे. हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ते सहज पचते. विशेष म्हणजे याची चव इतकी खूप छान आहे आणि तुम्ही एकदा खाल्ल्यास नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल.

लागणारे साहित्य

पालक

वाटाणा

गाजर

बटाटा

शिमला

हिरवी मिरची

कोथिंबीर

लसूण

आमचूर पावडर

मसाला

गरम मसाला

लिंबू

डाळीचे पीठ

हळद, धणे आणि गरम मसाला

काजू

Pineapple Chutney: तुम्ही कधी अननसाची चटणी खाल्ली आहे का? जाणून घ्या ते बनवण्याची खास रेसिपी

जाणून घ्या कृती

हे कबाब बनवण्यासाठी, बटाटे उकडा आणि मॅश करा.

पालक सुद्धा उकडून घ्या.

मटार, गाजर, सिमला मिरची, हिरवी मिरची परतून घ्या.

आता सर्वकाही मॅश करा किंवा बारीक बारीक करा.

धणे, हळद, लाल मिरची, चाट मसाला, गरम मसाला, बेसन, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करा.

सर्वकाही चांगले मिसळा.

आता कोथिंबीर आणि काजू चिकटवून तव्यावर शिजवा.

नंतर पुदिन्याच्या चटणीसोबत खा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel