मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care Tips: लांब आणि दाट केसांसाठी असे बनवा तेल आणि स्प्रे, काही दिवसात मिळेल बेस्ट रिझल्ट

Hair Care Tips: लांब आणि दाट केसांसाठी असे बनवा तेल आणि स्प्रे, काही दिवसात मिळेल बेस्ट रिझल्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 16, 2024 12:42 PM IST

Hair Growth: केस गळण्याची समस्या खूपच सामान्य आहे. तुम्हाला दाट आणि लांब केस हवे असतील तर घरच्या घरी तेल आणि स्प्रे बनवा. कसे ते जाणून घ्या.

केसांच्या वाढीसाठी तेल आणि स्प्रे
केसांच्या वाढीसाठी तेल आणि स्प्रे (unsplash)

Hair Oil and Spray to Boost Hair Growth: बहुतेक लोक केसांच्या समस्यामुळे त्रस्त असतात. काही लोकांचे केस गळतात तर काहींना टक्कल पडल्याने त्रास होतो. वास्तविक केसांच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकतात. पण काही लोकांना त्यांच्या जीवनशैलीची काळजी न घेतल्याने ही समस्या भेडसावते. केस लांब आणि दाट करण्यासाठी काही घरगुती पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. हेअर ऑइल आणि स्प्रे या दोन गोष्टी लावून तुम्ही तुमचे केस मजबूत करू शकता. केसांच्या वाढीसाठी घरी हेअर ऑइल आणि स्प्रे कसे बनवायचे ते जाणून घ्या.

कसे तयार करावे तेल

घरी तेल बनवण्यासाठी तुम्हाला मोहरी किंवा ऑलिव्ह ऑइल, कांदा आणि त्याची साल, कलौंजी, मेथी दाणे, आवळा, कढीपत्ता, मेहंदीचे सुकलेले पानं, तीळ, वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आवश्यक आहेत. तेल तयार करण्यासाठी प्रथम मध्यम आचेवर तेल गरम करा आणि नंतर त्यात सर्व साहित्य टाकून मिक्स करा. आता हे तेल साधारण ५ मिनिटे गरम करा. आता ५-६ तास तेल असेच राहू द्या आणि नंतर गाळून बॉटलमध्ये भरा. हे तेल तुम्ही १ महिन्यासाठी साठवू शकता.

कसे लावावे तेल

जेव्हाही तुम्ही हे तेल केसांना लावाल तेव्हा लक्षात ठेवा की ते किमान २ तास केसांवर ठेवावे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते केसांना लावून रात्रभर सुद्धा ठेवू शकता आणि नंतर सकाळी आपले केस धुवू शकता. लक्षात ठेवा की तेल लावल्यानंतर केसांना नीट मालिश करावी लागेल. जेणेकरून तेल नीट मुळाना लागेल.

कसे तयार करावे टॉनिक स्प्रे

केस मजबूत करण्यासाठी हे टॉनिक स्प्रे सर्वोत्तम आहे. हे बनवण्यासाठी तुम्हाला मेथीचे दाणे, कलौंजी, चहा, कढीपत्ता, काही तुकडे आले आणि कांद्याची साले आवश्यक आहेत. स्प्रे तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये पाणी घ्या आणि ते चांगले गरम करा. आता त्यात सर्व साहित्य टाकून मिक्स करा आणि उकळवा. नंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर गाळून घ्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या.

 

कसा वापरावा स्प्रे

चांगल्या रिझल्टसाठी हे टॉनिक स्प्रे रोज लावावे लागते. तुम्ही आंघोळीच्या १ तास आधी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ते लावू शकता. हे स्प्रे एका आठवड्यासाठी उबदार ठिकाणी ठेवून साठवले जाऊ शकते. तसेच ते थंड ठिकाणी ठेवले तर दोन आठवडे चांगले राहील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग