Natural Hair Colour: नारळाचे साल फेकू नका बनवा हेअर कलर, पांढरे केस होतील काळे
Natural Hair Dye for Grey Hair: जर तुम्ही अजूनही केस काळे करण्यासाठी रासायनिक कलर वापरत असाल, तर नॅचरल हेअर कलर बनवण्याची पद्धत जाणून घ्या. ज्यामुळे केस हानिकारक रसायनांशिवाय काळे होऊ शकतात.
Natural Hair Colour With Coconut Peel: आजकाल केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. ते काळे करण्यासाठी बहुतेक लोक डाय किंवा हेअर कलर वापरतात. पण डाय आणि कलरमध्ये आढळणारी रसायने त्वचा आणि केस दोघांनाही हानी पोहोचवतात. केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी बहुतेक लोक नैसर्गिक हेअर कलरचा पर्याय शोधतात. केस काळे करण्यासाठी केमिकल हेअर कलरऐवजी नैसर्गिक रंग वापरायचा असेल तर नारळाच्या सालीपासून बनवलेला हेअर कलर योग्य आहे. जे केसांना काळे करेल आणि सोबतच नुकसानापासून वाचवेल. चला तर मग जाणून घेऊया नारळाच्या सालीपासून केसांचा रंग कसा बनवायचा.
ट्रेंडिंग न्यूज
नारळाच्या सालीपासून हेअर कलर बनवण्याची पद्धत
घरी पूजा असो वा एखादा पदार्थ बनवायचा असो अशावेळी नारळ आणले जाते. नारळ वापरताना त्याचे साल फेकून दिले जाते. पण नारळाची साल फेकून देण्याऐवजी जमा करून ठेवा. ही साल पॅनमध्ये किंवा लोखंडी कढईत ठेवा. एक ते दोन कापूरच्या गोळ्या सोबत ठेवाव्यात आणि जाळून टाकाव्या. नारळाची साल जाळल्यावर त्याची काळी राख निघते. फक्त ही राख हलक्या हाताने मिसळा आणि एखाद्या डब्यात भरुन ठेवा.
पांढऱ्या केसांवर अशा प्रकारे लावा नारळाच्या सालीचा कलर
एका वाटीत जळलेल्या नारळाची साल काढून त्यात खोबरेल तेल मिक्स करा. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि पेस्ट बनवा. आता ते केसांना लावा आणि साधारण दोन ते तीन तास तसंच राहू द्या. नंतर केस पाण्याने स्वच्छ करा.
दिसेल परिणाम
हा नैसर्गिक हेअर कलर केसांवर लावल्याने त्याचा परिणाम दिसून येईल. तुम्ही दर १५ दिवसांनी हा नैसर्गिक हेअर कलर सहज लावू शकता. हे खूप प्रभावी आहे आणि केसांना कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून वाचवते. रासायनिक रंगांपासूनही सुटका मिळते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग