Hair Mask: पांढऱ्या केसांनी त्रस्त असाल तर हेअर कलर नाही लावा ही पेस्ट, दूर होतील हेअर प्रॉब्लेम
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Mask: पांढऱ्या केसांनी त्रस्त असाल तर हेअर कलर नाही लावा ही पेस्ट, दूर होतील हेअर प्रॉब्लेम

Hair Mask: पांढऱ्या केसांनी त्रस्त असाल तर हेअर कलर नाही लावा ही पेस्ट, दूर होतील हेअर प्रॉब्लेम

Published Jul 19, 2024 12:46 PM IST

Ayurvedic Hair Mask: अकाली पांढरे झालेले केस काळे करायचे असतील तर कलर किंवा डाय करण्याऐवजी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा हेअर मास्क लावा. काही दिवसांतच पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल.

पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक हेअर मास्क
पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक हेअर मास्क (unsplash)

Ayurvedic Mask to Turn Hair Black Naturally: अकाली केस पांढरे होणे ही अनेक मुला-मुलींची समस्या बनली आहे. हे पांढरे केस लपवण्यासाठी लोक मेहंदी आणि रासायनिक हेअर कलर लावतात. यातील रसायनांमुळे बरेच केस पांढरे होतात. शिवाय अनेक लोकांना या हेअर कलर किंवा मेहेंदी आणि डायमुळे केस गळण्याची समस्या देखील होते. वयाच्या ३० व्या वर्षी जर तुमचे केस पांढरे होत असतील तर त्यावर केमिकल हेअर कलर लावण्याऐवजी हा आयुर्वेदिक घरगुती उपाय करून पहा. हा हेअर मास्क आठवड्यातून २ ते ३ वेळा लावल्याने पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतील. शिवाय केस गळणे सुद्धा कमी होईल. चला तर मग जाणून घ्या पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी उपयुक्त आयुर्वेदिक हेअर मास्क कसा बनवायचा.

पांढऱ्या केसांची समस्या मूळापासून नष्ट करेल हा हेअर मास्क

जर तुम्हाला कमी वयात केस पांढरे होण्यापासून वाचवायचे असतील तर त्यावर हे हेअर मास्क लावण्याचा प्रयत्न करा. खरं तर अनेक वेळा योग्य पोषण न मिळाल्याने आणि केमिकल शॅम्पू आणि ऑईलसारखी उत्पादने वापरल्याने केस पांढरे होऊ लागतात. त्यामुळे डायटीशियन मनप्रीतने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली हे आयुर्वेदिक हेअर मास्क लावण्याचा प्रयत्न करा.

आयुर्वेदिक हेअर मास्क बनवण्यासाठी या गोष्टी लागतील

- १०० ग्रॅम नारळाचे तेल

- २० ग्रॅम कलौंजी

- एक मूठभर कढीपत्ता

- दोन चमचे मेथी दाणे

असे बनवा आयुर्वेदिक हेअर मास्क

हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका पॅन किंवा कढईत खोबरेल तेल गरम करा. आता आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तेलात टाकून भाजून घ्या. त्यांचा रंग डार्क होईपर्यंत ते नीट भाजा. ते काळे पडले तरी चालेल. आता या सर्व गोष्टींची पेस्ट बनवा.

कसे लावावे आयुर्वेदिक हेअर मास्क

आता हा हेअर मास्क केसांच्या मुळांवर नीट लावून घ्या. साधारण ३० मिनिटे हा मास्क केसांवर राहू द्या. त्यानंतर सल्फेट-फ्री शॅम्पूने केस धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner