Gujrati Street Food: गुजराती अनेक पदार्थ फार फेमस आहेत. घुगरा सँडविच हे गुजरातचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. यामध्ये पारंपरिक भाजीपाला सँडविचप्रमाणे भाज्या वापरल्या जात नाहीत, तर कांदा, सिमला मिरची आणि इतर मसाल्यांचे मिश्रण करून वापरले जाते. जर तुम्हालाही सँडविचचे शौक असेल तर यावेळी तुम्ही गुजराती स्टाइलचे घुगरा सँडविच घरीच ट्राय करू शकता. याची चव लहान ते मोठ्यांनाही खूप आवडेल. घुगरा सँडविच नाश्ता आणि स्नॅक्ससाठी एक उत्तम रेसिपी आहे. चला जाणून घेऊया घुगरा सँडविचची रेसिपी...
ब्रेड स्लाइस - ६
शिमला मिरची चिरलेली - १
कांदा बारीक चिरून - १
हिरवी मिरची - १-२
चीज - आवश्यकतेनुसार
आले चिरून - १ इंच तुकडा
काळी मिरी पावडर - १/४ टीस्पून
जिरे पावडर - १/२ टीस्पून
चिली फ्लेक्स - १/२ टीस्पून
चाट मसाला - १/२ टीस्पून
बटर - २ टेस्पून
हिरवी चटणी - २-३ चमचे
कोथिंबीर - ३-४ चमचे
मीठ - चवीनुसार
सिमला मिरची, कांदा, आले आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्यांना एका मोठ्या भांड्यात घालून मिक्स करावे. आता त्यात जिरे पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि काळी मिरी पावडर घाला. नंतर त्यात हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. सँडविचसाठी स्टफिंग तयार आहे. आता २ ब्रेड स्लाइस घ्या आणि त्यांच्या चारही बाजू कापून घ्या आणि वर बटर लावा. यानंतर ब्रेडच्या स्लाइसवर हिरवी चटणी सारखी पसरवा. आता प्रत्येक स्लाइसवर तयार मिश्रण लावा आणि त्यावर चीज खिसुन घाला. यानंतर वरच्या बाजूला दुसरा ब्रेड स्लाइसने झाकून घ्या. वरून बटर आणि हिरवी चटणी लावा.
आता सँडविच मेकर घ्या, दोन्ही बाजूंनी थोडं बटर लावा आणि त्यात सँडविच ठेवून बंद करा. यानंतर सँडविच ग्रील करण्यासाठी गॅसवर ठेवा. सँडविच दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत ग्रील करा. यानंतर, सँडविच एका प्लेटमध्ये काढा आणि चाकूच्या मदतीने बारीक करा. चवदार घुगरा सँडविच तयार आहे. वर टोमॅटो सॉस किंवा चटणी देऊ शकता.