Kairi Chutney Recipe: उन्हाळ्यात कच्च्या कैरीची चटणी आणि लोणच्याशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. जर तुम्ही रोज जेवताना कैरीची डिश मिस करत असाल तर आता बनवा गुजराती स्टाइल कैरीची गोड चटणी. ज्याला गुजरातीमध्ये छुंदा असेही म्हणतात. हे बनवायला खूप सोपे आहे आणि पटकन तयार होते. याची आंबट, गोड, तिखट चव लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायची चविष्ट कैरीची गोड चटणी किंवा छुंदा.
- एक ते दोन कैरी
- दोन किसलेले कांदे
- एक चमचा मीठ
- दीड चमचा भाजलेले जिरे
- एक चमचा लाल तिखट
- चिमूटभर हळद
- चार चमचे गूळ
हे बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरी नीट धुवून स्वच्छ करा. नंतर ते सोलून घ्या. आता सोललेल्या कैरी किसनीने किसून घ्या. दोन कांदे ही घेऊन चांगले किसून घ्या. आता एका काचेच्या बाउलमध्ये कैरी आणि कांदा घाला. तसेच गुळाची पावडर करून नंतर मिक्स करावे. भाजलेले जिरे, हळद आणि लाल तिखट टाकून एकत्र मिक्स करा. थोडे मीठ घालून मिक्स करून घ्या. आता हे तयार मिश्रण काचेच्या बरणीत भरा आणि काही दिवस तसेच ठेवा.
जेव्हा ही कैरी थोडी वितळली की तुमची चटणी खाण्यासाठी तयार होते. तुमची कैरीची गोड चटणी किंवा छुंदा तयार आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी सर्व्ह करा.