मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Peas Paratha Recipe: थंडीत गरमागरम मटर पराठा खाण्याची असते वेगळी मजा, प्रत्येकाला आवडेल ही रेसिपी

Peas Paratha Recipe: थंडीत गरमागरम मटर पराठा खाण्याची असते वेगळी मजा, प्रत्येकाला आवडेल ही रेसिपी

Jan 02, 2024 07:58 PM IST

Winter Special Recipe: नाश्ता असो वा दुपार किंवा रात्रीचे जेवण, हिवाळ्यात गरम गरम पराठे खायला बहुतेकांना आवडते. मटरचे पराठे कसे बनवायचे ते जाणून घ्या.

मटर पराठा
मटर पराठा (freepik)

Matar Paratha Recipe: हिवाळा सुरू झाला की नाश्त्यात वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले पराठे बनवले जातात. नाश्त्यात बटाटा, मुळा, कोबी, मेथीपासून बनवलेले पराठे जास्त प्रमाणात खाल्ले जातात. पण तुम्ही कधी मटरचे पराठे खाल्ले आहेत का? थंडीच्या दिवसात मटरचे पराठे खाण्याची एक वेगळी मजा असते. शिवाय ते पटकन तयार होतात. हे पराठे तुम्ही दही, रायता किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. जाणून घ्या टेस्टी मटर पराठे तसे बनवायचे.

ट्रेंडिंग न्यूज

मटर पराठा बनवण्यासाठी साहित्य

- १ वाटी मटर

- १ वाटी गव्हाचे पीठ

- २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- २ टेबलस्पून कोथिंबीर

- १ चिरलेला कांदा

- १ तुकडा किसलेले आले

- २-३ पाकळ्या लसूण

- अर्धा चमचा लिंबाचा रस

- अर्धा टीस्पून जिरे

- अर्धा चमचा गरम मसाला

- अर्धा चमचा धनेपूड

- तेल

- चवीनुसार मीठ

मटर पराठा बनवण्याची पद्धत

पराठे बनवण्यासाठी प्रथम गव्हाच्या पिठात थोडे मीठ आणि अर्धा चमचा तेल घालून मऊ पीठ मळून घ्या आणि १० मिनिटे बाजूला ठेवा. आता मटार सोलून १० मिनिटे पाण्यात उकळा जेणेकरून ते थोडे मऊ होतील. मटर उकळल्यानंतर त्याचे पाणी गाळून घ्या. आता मटार आणि हिरवी मिरची मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करा. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका आणि तडतडू द्या. यानंतर त्यात चिरलेला कांदा, आले, लसूण घालून ५ मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात मटार, गरम मसाला पावडर, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून मिक्स करा. हे सारण बाजूला ठेवा. आता पराठा बनवण्यासाठी पीठाचा एक गोळा घ्या लाटून घ्या. त्यात वाटाण्याचे सारण भरा आणि नीट बंद करून हलक्या हाताने लाटून घ्या. 

तवा गरम झाल्यावर तव्यावर लाटलेला पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या. पराठ्याला तेल लावून ते सोनेरी होईपर्यंत नीट भाजून घ्या. तुमचा पराठा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

WhatsApp channel