Peas Kebab: संध्याकाळच्या चहाची लज्जत वाढवेल वाटाण्याचे टेस्टी कबाब, बनवण्यासाठी ट्राय करा ही रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Peas Kebab: संध्याकाळच्या चहाची लज्जत वाढवेल वाटाण्याचे टेस्टी कबाब, बनवण्यासाठी ट्राय करा ही रेसिपी

Peas Kebab: संध्याकाळच्या चहाची लज्जत वाढवेल वाटाण्याचे टेस्टी कबाब, बनवण्यासाठी ट्राय करा ही रेसिपी

Published Jan 17, 2024 06:34 PM IST

Evening Snacks Recipe: संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल तर तुम्ही वाटाण्याचे कबाब बनवू शकता. हिवाळ्यात चहासोबत गरमा गरम कबाब खायला खूप टेस्टी लागतात. जाणून घ्या रेसिपी.

वाटाण्याचे कबाब
वाटाण्याचे कबाब (freepik)

Green Peas Kebab Recipe: संध्याकाळी चहासोबत कबाब खायला अनेकांना आवडतात. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या वाटाण्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. तुम्ही वाटाण्यापासून टेस्टी कबाब बनवू शकता. शाकाहारी लोकांसाठी हा स्नॅक्सचा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्याची चव लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. घरी वाटाण्याचे कबाब बनवण्यासाठी जाणून घ्या रेसिपी.

वाटाण्याचे कबाब बनवण्यासाठी साहित्य

- १ कप हिरवे वाटाणे

- १ कप चिरलेला पालक

- १ मध्यम आकाराचा कांदा

- ५ ते ६ पाकळ्या लसूण

- किसलेले आले

- हिरवी मिरची

- १/२ कप चना डाळ

- गरम मसाला

- कसुरी मेथी

- २ चमचे तेल

- चवीनुसार मीठ

- काळे मीठ

- तूप

वाटाण्याचे कबाब बनवण्याची पद्धत

कबाब बनवण्यासाठी प्रथम हरभरा डाळ भिजवून उकळा. ते पूर्णपणे मऊ होईपर्यंत उकळवा. आता कांदा, लसूण आणि हिरवी मिरची नीट धुवून बारीक चिरून घ्या. वाटाणे देखील चांगले उकळवा. आता कढईत थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाका. २० ते ३० सेकंद भाजून घ्या. मग त्यात कांदा घालून परता. आता त्यात मीठ, पालक आणि हरभरा डाळ टाकून शिजवून घ्या. नंतर त्यात गरम मसाला घाला. सर्व व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करा आणि नंतर मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर बारीक करून घ्या. आता पुन्हा कढईत बारीक केलेले वाटाणे घाला आणि चांगले शिजवा. मिश्रण थोडे कोरडे होईपर्यंत शिजवा. पेस्ट भाजून झाल्यावर त्यात कसुरी मेथी घाला. ते थंड झाल्यावर तुम्ही कबाब बनवू शकता. 

आता त्याचे छोटे छोटे भाग घेऊन कबाबच्या आकारात बनवा. नंतर ते भाजून घ्या. भाजण्यासाठी तूप किंवा तेल वापरा. दोन्हीकडून सोनेरी भाजून घ्या. तुमचे टेस्टी कबाब सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.

Whats_app_banner