मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ginger Halwa Recipe: हिवाळ्यात हेल्दी राहायचे असेल तर, खा आल्याची खीर! नोट करा रेसिपी

Ginger Halwa Recipe: हिवाळ्यात हेल्दी राहायचे असेल तर, खा आल्याची खीर! नोट करा रेसिपी

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 03, 2024 11:11 PM IST

Winter Care Tips: थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. आवर्जून आल्याची खीर हिवाळ्यात खा.

Winter Special Recipe
Winter Special Recipe (freepik)

Winter Health: हिवाळ्यात अनेकदा संसर्ग होतात. सर्दी, ताप, घसा खवखवण्याचा त्रास होतो. हे असं का होत याचे पहिले कारण म्हणजे कमकुवत प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती कमी झाली की मौसमी रोग तुमच्यावर हल्ला करत राहतात. अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. याकडे तुम्ही सर्वाधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. लाइफस्टाइलमध्ये यासाठी काही बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम आणि आहारात काही गोष्टींचा समावेश करा. यासोबतच तुम्ही निरोगी राहण्यासाठी तुम्ही आल्याची खीर देखील खाऊ शकता. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी आणि त्याचे फायदे.

लागणारे साहित्य

अर्धी वाटी किसलेले आले, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, एक चौथा वाटी गूळ, ४ टेबलस्पून तूप, २ चिमूटभर हळद आणि १/४ टीस्पून काळी मिरी.

जाणून कृती

> सर्वप्रथम गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा आणि गरम होताच त्यात तूप घालून वितळून घ्या.

> आता त्यात आले टाका आणि सतत ढवळत राहा. ३ ते ४ मिनिटे शिजल्यानंतर त्यात गव्हाचे पीठ घालून परतून घ्या.

> पीठ सोनेरी होईपर्यंत परता.

> यानंतर हळद आणि काळी मिरी घालून मिक्स करा.

> दुसऱ्या पातेल्यात गूळ फोडून पाण्याने घट्ट द्रावण तयार करा. आता कढईत गूळ आणि पाणी यांचे मिश्रण घालून चांगले एकजीव करा.

> हलव्याच्या इच्छेनुसार गुळाच्या पाण्याची कंसिस्टेंसी तपासा.

> सर्वकाही एकत्र करा आणि थंड होऊ द्या. यानंतर डब्यात ठेवा.

> हिवाळ्यात रोज २ चमचे हा हलवा खा.

हे फायदे मिळतात

> शरीर उबदार राहते.

> थंडीपासून संरक्षण करते.

> प्रतिकारशक्ती वाढते.

> सर्दी, घसा खवखवणे आदी समस्या दूर राहतात.

> पचनाशी संबंधित समस्या दूर करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel