मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Healthy Snacks: संध्याकाळच्या चहासोबत खा हा हेल्दी स्नॅक, जाणून घ्या रेसिपी!

Healthy Snacks: संध्याकाळच्या चहासोबत खा हा हेल्दी स्नॅक, जाणून घ्या रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 25, 2024 05:45 PM IST

Garlic-Ragi Crackers Recipe: संध्याकाळची भूक भागवण्यासाठी समोसे, भजी, बिस्किट असे पदार्थ बनवले जातात. पण हे सोडून आम्ही आज तुम्हाला एक हेल्दी पर्याय सांगणार आहोत.

Healthy Snack recipe
Healthy Snack recipe (freepik)

Winter Recipes: हिवाळ्यात आवर्जून संध्याकाळचा गरमागरम चहा प्यायला जातो. थंड वातावरणात गरम चहा सुख देतो. यासोबत काही तरी गरम स्नॅकही (tea time snacks) हवाहवासा वाटतो. अशावेळी अनेकदा चिप्स, मॅगी, बिस्किटे, नमकीन, समोसा, वडा खाल्ला जातो. पण हे पदार्थ कोलेस्ट्रॉलसोबत लठ्ठपणाही वाढवतात. अशावेळी काही तरी हेल्दी रेसिपीचा पर्याय शोधला जातो. आज आम्ही तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहोत जी बनवायला खूप सोपी आणि चवीला अप्रतिम आहे. हा पदार्थ तुमची छोटी भूक भागवेल आणि टेस्टलाही बेस्ट असेल. जाणून घ्या लसूण-नाचणी क्रॅकर्सची रेसिपी. नाचणीमध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

लागणारे साहित्य

नाचणीचे पीठ- ६० ग्रॅम, गव्हाचे पीठ- ७० ग्रॅम, मिक्स हर्ब्स- २ चमचे, बेकिंग पावडर- १/२ चमचे, ऑलिव्ह तेल- १ टेबलस्पून, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी, पीठ मळण्यासाठी पाणी.

जाणून घ्या रेसिपी

> सर्वप्रथम नाचणीचे पीठ गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या.

> यानंतर भाजलेल्या नाचणीच्या पिठात गव्हाचे पीठ, मिक्स्ड हर्ब्स, बेकिंग पावडर, मीठ आणि काळी मिरी घाला. नंतर त्यात ऑलिव्ह ऑईल घालून मिक्स करा.

> हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या आणि नंतर २० मिनिटे सोडा.

> ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करा.

> आता कणकेचा गोळा घ्या आणि साधारण १/८ इंच जाडीचा रोल करा.

> याला शिजवण्याआधी ती काट्याने टोचून घ्या, म्हणजे ते फुगणार नाही.

> हे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत ७-८ मिनिटे बेक करा.

> यानंतर रम टेम्परेचरला येऊ द्या.

> दरम्यान, एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल, चिली फ्लेक्स, मीठ आणि ठेचलेला लसूण एकत्र मिक्स करा.

> क्रॅकर्सवर हे मिश्रण लावा.

 

WhatsApp channel